Breaking
ब्रेकिंग

मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांनो सावधान !

 नवी मुंबई प्रतिनिधी - सुनील गायकवाड.

0 0 2 8 7 3

 मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांनो सावधान ! तुमची थोडीशी चूक मोठी ठरते… तुम्हालाच केले जाते टारगेट! परिणामी तुमची अवस्था ना “घर का ना घाट का “..

 शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये जे सरकारी बाबू आहेत त्या बाबूंच्या विषयी नागरिकांना चांगलाच अनुभव पहावयास येत आहे कोणता अधिकारी / कर्मचारी धुतळ्या तांदळासारखा स्वच्छ आहे शासकीय किंवा निमशासकीय सेवेचा हक्काचा पगार घेऊन त्यांनी इतर कामाचे पैसे लाच म्हणून स्वीकारले नाहीत असा उच्चस्तरीय अधिकारी अथवा कर्मचारी शोधून दाखवा याचे उत्तर नक्कीच नाही असे असणार आहे भ्रष्टाचारापासून त्याचा दूर दूर चा संबंध नाही असा अधिकारी शासकीय निम शासकीय कार्यालयात शोधणे म्हणजे अंधारातून हिरा शोधल्यासारखं होईल हे चित्र सर्वत्र शासकीय कार्यालयामध्ये उघड्या डोळ्यांनी नागरिकांना दिसत आहे मात्र या चित्रांमध्ये जो मागासवर्गीय फुले शाहू आंबेडकरी विचाराचा अधिकारी अथवा कर्मचारी आहे अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला काही समाजकंटक लोक जाणून-बुजून आपल्या जाळ्यात ओढून त्याच्या नोकरीची शिकार करण्याचा कट साधत आहेत त्यामुळे फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या प्रशासकीय व निमशासकीय मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी कोणत्याच प्रकारच्या आमिषाला बळी न पडता आपले कर्तव्य कायद्याप्रमाणे राखून कायद्याच्या चौकटीतच काम केले पाहिजे असे काम न केल्यास ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे व सध्या चर्चेत असलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड यांच्या बाबतीत लाच प्रतिबंधक विभागाने ज्याप्रकारे कारवाई केली त्या कारवाईला वातानुकूलित कार्यालयामध्ये मध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना शासनाच्या बिना पंख्याच्या खोलीमध्ये आपला वेळ ना इलास्तव घालावा लागेल 

सध्याच्या परिस्थितीमध्ये मागासवर्गीय अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केले जात असून त्याच अधिकाऱ्यांच्या वर लाच लुचपत विभागाचा सापळा रचला जात आहे त्यामुळे मागासवर्गीय अधिकाऱ्यांनी आपले डोके ठिकाणावर ठेवून पैशाच्या आमिषाला बळी न पडता आपले कर्तव्य चोख बजवले पाहिजे तसे न केल्यास डॉक्टर कैलास गायकवाड नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त त्यांना लाचलुचपत पथकाच्या पथकाने त्यांच्याच कार्यालयात ४२ हजार इतके शिल्लक लाच घेताना रंगीहात पकडल्याचे सामोरे आले आहे आज त्यांच्यावर जी वेळ आलेली आहे तशीच वेळ भविष्यात तुमच्या वरती येऊ नये यासाठी सतर्क राहिले पाहिजे डॉक्टर कैलास गायकवाड हे आज जात्यात आहेत आणि तुम्ही सुपात आहात जर लाचेच्या लालसेपोटी तुमचा हात तुम्ही पुढे केले तर सुपातून कधी जात्यात जातील याचा तपास लागणार नाही त्यामुळे फुले शाहू आंबेडकरी विचाराचे जे मागासवर्गीय अधिकारी आहेत त्याने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडायला हवे अन्यथा लाचेच्या माध्यमातून कमवली गेलेली धनलक्ष्मी ही कधी सरकार जमा होईल याची शाश्वती देता येणार नाही.

शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये काम करणारा कर्मचारी कोणत्याही जातीचा असो त्या अधिकाऱ्याने एखाद्या कामासाठी लाच घेणे हे कायद्याला धरून नाही मात्र अशा कार्यालयामध्ये अनेक अधिकारी कर्मचारी सर्रासपणे लाच घेताना आढळतात मात्र त्या अधिकाऱ्यांच्या वर स्वतःला समाजसेवक अथवा भ्रष्टाचारी विरोधी कार्यकर्ता समजणाऱ्या व्यक्तीला फक्त मागासवर्गीय जातीचे कर्मचारी त्यांच्या नजरेस दिसून येतात त्यामुळे त्यांची मानसिकता देखील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधातली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये अनेक बडे अधिकारी आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात लाच घेतात अशा बड्या अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट केल्यास त्यांची कुठे आणि किती बेनामी मालमत्ता आहे याची कल्पना नार्कोटेस च्या माध्यमातून समोर येईल मात्र लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या व्यक्ती हा मागासवर्गीय अधिकाऱ्याचीच तक्रार करत असतो त्यामुळे मागासवर्गीय अधिकारी लाचलुचपत पथकाच्या गळाला अलगत लागत असतो व त्याची शिकार ठरल्याप्रमाणे केली जात असते त्यामुळे मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यानी वेळीच सावधानाचा पवित्र घेऊन 

निपक्षपातीपणे नक्कीच काम केले पाहिजे अन्यथा नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर कैलाश गायकवाड यांच्या वाट्याला जे आले ते तुमच्याही वाट्याला भविष्यात येऊ शकते पुढच्याला ठेस तर मागच्याने शहाणे व्हायला हवे. 

 लाखो रुपयाचा पगार सरकारी वाहन, चालक, कार्यालयात बसायला वातानुकूलित एसी कर्मचाऱ्यांच्या वर दबदबा नागरिकाकडून रिस्पेक्ट इतका मोठा एखाद्या राजासारखा रुबाब असताना देखील ४२ हजार रुपयाची शिल्लक लाच घेताना अधिकाऱ्यांना लाज का वाटत नाही ज्या व्यक्तीला लाच घ्यायला लाज वाटते त्याची मान प्रतिष्ठा अबाधित राहते.

नवी मुंबई प्रतिनिधी – सुनील गायकवाड.

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे