0
0
2
6
4
7
रबाले पोलीस ठाणे अंतर्गत अमली पदार्थ विरोधात जनजागृती कार्यक्रम संपन्न !
नवी मुंबई प्रतिनिधी
तरुणांनी अमली पदार्थाच्या आहारी जाऊ नये यासाठी रबाले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रबाले पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी अमली पदार्थ विरुद्ध जनजागृती अभियान राबविण्यात आला
सदरचे अभियान 15 ऑगस्ट ते 16 या दरम्यान राबविण्यात आला आहे. रबाले पोलीस ठाणे हद्दीतील
सेंट झेवियर स्कूल मजुद्दीन हायस्कूल, न्यू हॉरिझन, ए एस पी स्कूल डीएव्ही स्कूल, महानगर पालिका शाळा क्रमांक १२० व ४८ या ठिकाणी व्याख्याने व शिबिरे आयोजित केली होती
दरम्यान: अंमली पदार्थ विरोधी जनजागृती याबाबत संवाद साधण्यात आला मजुद्दीन हायस्कूलचे शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यावतीने प्रभात फेरी काढण्यात आली रेल्वे रबाळे स्टेशन परिसरात मानवी साखळी चे आयोजन करण्यात आले डिजिटल बोर्ड प्रसारित करण्यात आले जिजामाता रुग्णालय ऐरोली, तसेच सर्व सरकारी कार्यालयात देखील अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली. रबाले रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थ जनजागृती विरोधात माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते.
तरुणांमध्ये अमली पदार्थ या घातक व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास येत आहे येत्या भावी पिढीमध्ये या अमली पदार्थाच्या बीमोड व्हावा या दृष्टिकोनातून शाळा महाविद्यालय रेल्वे स्टेशन परिसर रुग्णालय या ठिकाणी अमली पदार्थ विषयी जनजागृती मोहीम अमलात आणली गेली होती या मोहिमेमध्ये नागरिकांनी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे,
बाळकृष्ण सावंत
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राबले पोलीस ठाणे नवी मुंबई
सुनील गायकवाड.
0
0
2
6
4
7
