Breaking
ब्रेकिंग

भूमाफियांना उमेदवारी दिल्यास मतदान करणार नाही! मतदारांचा निर्धार!..

नवी मुंबई प्रतिनिधी - सुनील गायकवाड.

0 0 2 6 4 7

नवी मुंबईत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भूमाफियांना उमेदवारी दिल्यास मतदान करणार नाही! मतदारांचा निर्धार!…

नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येता 15 जानेवारी 2026 रोजी पार पडणार असून या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार राजकीय पक्षाच्या तिकिटावर उभे राहण्यास इच्छुक आहेत मात्र राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एखाद्या भूमाफियाला अथवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला तिकीट दिल्यास अशा उमेदवाराला मतदार नागरिक म्हणून आम्ही मतदान करणार नाहीत असा थेट इशारा नवी मुंबई मधील राहणाऱ्या मतदार नागरिकांनी राजकीय पक्षांना दिलेला आहे. निवडणुकीच्या माध्यमातून अनेक भूमाफिया राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये आपण समाजसेवक आहोत अशा प्रकारचा आव आणून आपल्या समाजसेवेची प्रोफाइल राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दाखवून पक्षाचे उमेदवारी तिकीट मिळवण्यात सफल होत असतात मात्र यांची खरी समाजसेवा ही प्रभागातील राहणाऱ्या मतदार नागरिकांना माहिती असते त्यामुळे खोट्या प्रोफाइल पाहून राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकंदरीत प्रभागाचा विचार करून हा उमेदवार नक्कीच समाजसेवक आहे का? की भू माफिया! त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे का याबाबत आपल्या कार्यकर्त्यांच्या कडून चौकशी करून अशाच व्यक्तीला उमेदवारी दिली पाहिजे असे स्पष्ट मत मतदान करणारे नागरिक व्यक्त करत आहेत सुदृढ लोकशाही टिकवण्यासाठी प्रामाणिक आणि चांगला व्यक्ती कोणत्याही सभागृहामध्ये गेला तर देशांमध्ये सुदृढ लोकशाही अधिक मजबूत होईल असे मतदार नागरिकांना वाटत असल्याने त्यांनी आपले मत व्यक्त केलेले आहे.

एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासोबत फिरून अथवा त्याचे बॅनर पोस्टर बनवून हे भूमाफिया बिनधास्तपणे अनाधिकृत इमारती बनवून गडगंज पैसा कमवत असतात त्याच पैशाच्या काळयाकमाई वरती हे भू माफिया बिनधास्तपणे निवडणूकच्या रिंगणात उभे राहण्याचे धाडस करतात कोणत्याच प्रकारचे पद नसताना हे भूमाफिया गडगंज संपत्ती करून वाटेल तसे बेकायदा काम करत असतात त्यांच्या हातात जर प्रभागाचे नगरसेवक पद आल्यास हे भूमाफिया कोणती समाजसेवा करणार आहेत म्हणून अशा भू माफिया आणि गुन्हेगारीची पार्श्वभूमी असणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित करू नये असे झाल्यास सुज्ञ मतदार म्हणून मतदारा नागरिक गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि भूमाफिया असलेल्या उमेदवारांना मतदान करणार नाहीत.

नवी मुंबई प्रतिनिधी – सुनील गायकवाड

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे