Breaking
ब्रेकिंग

रबाले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट!

सुनील गायकवाड

0 0 2 6 4 7

रबाले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट!

नवी मुंबई प्रतिनिधी

रबाले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोबाईल चोरीची वाढती घटना घडत असल्याचे समोर येत आहे या घटनेला आळा घालण्यासाठी रबाले पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी या मोबाईल चोरांचा बंदोबस्त करावा अशा प्रकारची मागणी नागरिका कडून होत आहे. ऐरोली विभाग सेक्टर 5 नवरात्र हॉटेलच्या बाजूने रस्त्यात चालत असलेल्या निलेश बबन सोनवणे वय वर्षे 34 यांच्या हातातला मोबाईल अज्ञात चोरट्याने हिसकावून पोबारा केला आहे. निलेश सोनवणे हा कामावरून येत असताना अज्ञात चोरट्याने स्कुटी वरून येऊन पायी चालत असलेल्या निलेश सोनवणे यांच्या हातातला मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढलेला आहे. सदरची घटना ऐरोली सेक्टर 5 या ठिकाणी घडलेली आहे याबाबत रबाले पोलिसांनी मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार नोंदविली आहे

रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा ही अतिशय प्रभावशाली असे काम करीत आहे या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आतापर्यंत अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करून आरोपींच्या मुस्क्या अवळण्यात यश प्राप्त केले आहे अशा मोबाईल चोरांच्या घटनांचे प्रकरण देखील गुन्हे प्रकटीकरण शाखेला देऊन या मोबाईल चोरांचा छेडा लावण्यास नक्कीच गुन्हे प्रकटीकरण यश प्राप्त करेल असा नागरिकांचा विश्वास आहे. रबाले गुन्हे प्रकटी करण शाखेची कामगिरी आतापर्यंत उल्लेखनीय अशीच ठरलेली आहे.

सुनील गायकवाड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे