घनसोल मध्ये बुद्ध विहाराच्या जागेसाठी शरद बर्वे रिपब्लिक सेनेच्या वाटेवर! शिवसेना रिपब्लिक सेनेच्या युतीचा प्रभाव!
नवी मुंबई प्रतिनिधी
घनसोली विभागात बौद्ध बांधवांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे यापूर्वी बौद्ध बांधवांना प्रार्थनेसाठी एखादी जागा हवी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने सेक्टर 4 येते बुद्धघोष बुद्ध विहार पंधरा वर्षापासून सिडकोच्या जागेवरती बौद्ध बांधवांनी आपले प्रार्थना स्थळ बांधलेले होते मात्र सिडकोणे जागा समर्थ को-ऑपरेटिव्ह सोसायटी या माथाडी कामगारांच्या संघटनेला दिले असल्याचे कारण दाखवत सदरचे बुद्ध विहार जमीन दोस्त केले. सिडको ने सदरची जागा समर्थ को-ऑपरेटिव्ह सोसायटीला कायदेशीर रित्या दिल्याने घनसोलीतील बौद्ध बांधवांनी कोणत्या प्रकारचा वाद विवाद न करता ती जागा सिडकोकडे शांततेच्या मार्गातून ताब्यात दिली
सन 2023 या वर्षा सदरचे बुद्ध विहार तोडण्यात आले त्यानंतर बौद्ध बांधवांनी सिडकोकडे इतरत्र जागेची मागणी आंदोलने केली व सिडकोचे जे बाजार मूल्य भाव आहे ती भरण्याची तयारी दर्शवली मात्र सिडकोणे आतापर्यंत कोणत्याच प्रकारची कारवाई न केल्याने बौद्ध बांधवांनी नाराजी व्यक्त केलेली आहे
दरम्यान: रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी शिवसेना पक्षाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी युती केल्याने एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घणसोलीतील बुद्ध विहाराचा जागेचा प्रश्न निकाली निघू शकतो अशी अशा बाळगून घनसोलीतील सामाजिक कार्यकर्ते शरद बर्वे हे रिपब्लिकन सेनेच्या वाटेवर आहेत त्यांच्यासोबत घनसोलीतील बौद्ध बांधव देखील आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेना मध्ये सक्रिय सहभाग घेऊन सामील होणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे.
घणसोली विभागातील बांधवांना आपल्या प्रार्थना स्थळासाठी स्वतःची जागा हवी आहे मात्र सिडको प्रशासन जाणून बुजून बौद्ध बांधवांना जागा देत नसल्याचे निदर्शनास आले आहे बौद्ध बांधवांनी अनेक वर्षापासून पत्र व्यवहार करून देखील त्यांची कोणत्याच प्रकारची दखल घेतलेली नाही मात्र रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराव आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती केल्याने बौद्ध विहाराचा जागेचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो म्हणून मी रिपब्लिकन सेनेच्या वाटेवरती आहे.
शरद बर्वे
सामाजिक कार्यकर्ते घनसोली