वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईने रबाले पोलिसांशी घातला वाद!
दिव्यांगांच्या आरक्षणातून आयएस पदाचा लाभ घेतलेल्या वादग्रस्त प्रकरणी चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांची आई पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे त्यांनी पुण्यात तपासा दरम्यान गेलेल्या रबाले पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून एक नवा वाद निर्माण केलेला आहे त्यामुळे रबाले पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत माहिती अशी की मुलुंड ते ऐरोली रोडवरील रबाले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिग्नलवर प्रल्हाद कुमार वय वर्ष (२२) राहणार तुर्भे एमआयडीसी नवी मुंबई या वाहन चालकाने मिक्सर ट्रक घेऊन जात असताना वाहन कार क्रमांक एम एच १२ आर टी ५०० या कारला मिक्सर ट्रकचा धक्का लागल्याने संताप्त झालेल्या या कारचालकाने व त्याच्या साथीदाराने मिळून त्याला जबरदस्तीने आपल्या कार मध्ये बसून त्याचे अपहरण केले असल्याची तक्रार रबाले पोलीस स्टेशन ठाण्याच्या दाखल केली होती रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन अपहरण झालेल्या मिक्सर ट्रक चालकाची सुटका करावी अशा सूचना रबाले पोलीस पोलिसांना केल्या होत्या त्यानुसार रबाले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी पुढाकार घेतला त्यानुसार या कारचा मागोवा घेत असताना सदरची कार पुणे येथे गेली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात यांनी कारचा शोध घेत असता वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या चतुशृंगी हद्दीतील घराजवळ सदरची कार उभी असल्याचे तपास अधिकारी दीपक खरात यांच्या निदर्शनास आले त्यानुसार दीपक खरात व त्यांचे पथक पूजा खेडकर यांच्या आईच्या घरी चौकशीसाठी गेले असता पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांना चौकशी दरम्यान सहकार्य न करता त्यांच्याशी हुज्जत घातली
दरम्यान :अपहरण झालेल्या मिक्सर ट्रक चालकाची सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात व त्यांच्या पथकाने सुखरूप सुटका केली आहे.
तपास करत असताना पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांची अरेरवी करत आपल्या घरचा दरवाजा न खोलताच पोलिसांची हुज्जत घालून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे
दरम्यान या प्रकरणी रबाले पोलिसांनी पूजा खेडकर यांच्या आईला पुढील तपासासाठी रबाले पोलीस ठाण्यात येण्याच्या सूचना केल्या असून याबाबतचा तपास रबाले पोलीस करीत आहेत.