Breaking
ब्रेकिंग

 नवी मुंबई परिवहन विभागाच्या कल्याण साठी जादा गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात प्रवासी नागरिकांची मागणी !

नवी मुंबई प्रतिनिधी - सुनील गायकवाड

0 0 2 6 4 7

नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे सोडण्यात येणाऱ्या कल्याणला जाणाऱ्या गाड्यांच्या संख्या मध्ये वाढ करावी अशी मागणी प्रवाशांची आहे वाशी कडून येणाऱ्या कल्याण गाड्या या वेळेवर न येत असल्याने प्रवाशांना ताटकळत बस स्टैंड वर बसावे लागत आहे जरी वेळेवरती आल्या तरी कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशांना कल्याण पर्यंत धक्काबुक्की करत पुढे जावे लागत आहे त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या ज्या परिवहनच्या गाड्या आहेत त्या गाड्यांच्या जादा फेऱ्या वाढून प्रवाशांना दिलासा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे 

 दरम्यान: नवी मुंबई शहरामध्ये कल्याण शिळफाटा लोढा या भागातून मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग नवी मुंबईत ये जा करत आहे त्यामुळे प्रवासाची तुफान गर्दी वाशी कडून येणाऱ्या कल्याण बस मध्ये पाहण्यास मिळते त्यामुळे एकट्या वाहकाचे देखील प्रचंड हाल होत आहे नाईलास्तव या वाहकाला आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहेत जादा गाड्या नवी मुंबई परिवहन विभागाने सोडल्यास कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळेल त्यामुळे नवी मुंबई परिवहन विभागाने कल्याणकडे जाणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून कडून होताना दिसत आहे.

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे