Breaking
ब्रेकिंग

 रबाले पोलीस ठाण्याकडून सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती अभियान!.. नागरिकांचा उत्तम प्रतिसाद!..

 नवी मुंबई प्रतिनिधी- सुनील गायकवाड 

0 0 2 6 4 7

नागरिकांनी सायबर क्राईम बाबतीत घडणाऱ्या फसवणुकीबाबत सतर्क रहावे व सायबर गुन्हेगार कशाप्रकारे नागरिकांची ऑनलाइन अथवा इतर मार्गाने फसवणूक करत असतात याबाबतीत रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या सूचनेनुसार रबाले पोलिसांनी 

 दि. 27/10/2024 रोजी रबाळे पोलीस स्टेशन हद्दीत सायबर अवरनेस जनजागृती अभियानांतर्गत एकुन 6 ठिकाणी कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्यात आली यावेळी फसवणुकी दरम्यानचे प्रभावी मुद्दे घेऊन 

 लोकांना माहिती समजून सांगितली व फसवणूक होऊ नये म्हणून यासंदर्भात सायबर सुरक्षा बाबत जनजागृती करण्यात आली. या अभियानांतर्गत नागरिकांनी

अनोळखी व्यक्तीस ओटीपी शेअर करू नका.

अनोळखी लिंक ओपन करू नका.

डिजिटल अरेस्ट हा फसवणुकीचा प्रकार असल्याने घाबरून जाऊ नका, पोलीस ठाण्याची संपर्क करा.

 शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक खात्रीशीर करा.अनोळखी व्यक्तीस आपली माहिती शेअर करू नका.

दुप्पट पैसे, डिस्काउंट, पटकन लोन, यासारख्या लोभाला बळी पडू नका.

सायबर फसवणुकीचे तात्काळ मदती करता 1930/1945 डायल करा. पोलीस मदतीसाठी 112 Dial करा.

   दरम्यान: वरील मुद्द्यांच्या आधारे विश्लेषण करून लोकांमध्ये जनजागृती केली या अभियानाला रबाळे पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांनी सायबर क्राईम बाबत माहिती जाणून घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सायबर गुन्ह्याबाबतीत नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे त्यामुळे सायबर गुन्हे जनजागृती अभियान वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत राबवित आहोत नागरिक देखील सायबर गुन्ह्याची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी या जनजागृती अभियानाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देत आहेत त्यामुळे भविष्यात सायबर गुन्ह्याची घट झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास नक्कीच या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून वाटतो…

 

 बाळकृष्ण सावंत 

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक रबाळे पोलीस ठाणे

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे