Breaking
ब्रेकिंग

एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश !

पनवेल प्रतिनिधी - सागर पगारे.

0 0 2 6 4 7
  • एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

औरंगाबाद : महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला मिळालेले अभूतपूर्व यश, सत्तेकडे सुरू असलेली ठाम वाटचाल तसेच उमेदवार मुलाखतींसाठी उसळलेली गर्दी ही बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्पष्ट ध्येय-धोरणांची फलश्रुती असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक न्यायावर आधारित राजकारणाने प्रभावित होऊन एमआयएमच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधतीताई शिरसाठ यांच्या हस्ते जाहीरपणे पक्षप्रवेश केला.

यामध्ये एमआयएम शहर उपाध्यक्ष अस्लम सय्यद यांच्यासह अजीम पठाण, अमन शेख, जुबेर पटेल, इमरान खान, अबूजर शेख, एजाज शेख, सोहेल शेख, अन्सार पठाण, इरफान शेख, मेहरा शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

या पक्षप्रवेशावेळी वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष ॲड. रामेश्वर तायडे, औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष पंकज बनसोड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पनवेल (सागर पगारे )

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे