Breaking
ब्रेकिंग

ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांचे सोमवारी ता. १८ ऑगस्ट रोजी निधन झाले.

पनवेल प्रतिनिधी - सागर पगारे.

0 0 2 6 4 7

पनवेल प्रतिनिधी सागर पगारे , ता .१८ रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांचे सोमवारी ता. १८ ऑगस्ट रोजी निधन झाले. किरण यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी कामोठे येथील एम जी एम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी किरण यांनी मृत्यूशी झुंज दिली पण ती अयशस्वी ठरली अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेऊन त्यांची प्राण ज्योत मालवली.
मुरूड येथील त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर ता . १९ /८/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
किरण यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील मूलभूत प्रश्नांना वाचा फोडली.
त्यांनी अनेक सामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला. पत्रकारांच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले त्यात त्यांचा मोठा वाटा होता
सद्यस्थिती किरण हे पनवेल प्रेस क्लब या संस्थेचे अधिकृत सदस्य म्हणून काम करत होते. एक मेहनती सहकारी हरपल्याने संस्थेची देखील मोठी हानी झाली आहे. मात्र किरण यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे आहे. त्या दुःखात पनवेल प्रेस क्लब सहभागी आहे. कुटुंबाला दुःख पेलण्याची शक्ती मिळो यासाठी पनवेल प्रेस क्लब परिवाराकडून प्रार्थना करण्यात आली आहे.

पनवेल प्रतिनिधी सागर पगारे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे