Breaking
ब्रेकिंग

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस च्या वतीने महापालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे साहेब यांना निवेदन देण्यात आले.

पनवेल प्रतिनिधी - सागर पगारे.

0 0 2 6 4 7

आज पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे साहेब यांना महानगरपालिकेतील नागरी समस्या, तसेच होऊ घालणाऱ्या महानगरपालिका निवडणुका संदर्भात असलेल्या प्रभाग रचने संदर्भात, तसेच संपूर्ण पनवेल महानगरपालिकेमध्ये असलेल्या सर्व रस्त्यांच्या कामा संदर्भात, आणि वसाहत क्षेत्रामध्ये येणाऱ्या मोबाईल टॉवर्सच्या धोक्यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. तसेच काँग्रेस पक्ष म्हणून नवीन पनवेल येथे असलेल्या राजीव गांधी मैदानाच्या नामफलका संदर्भात आयुक्तांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आणि महात्मा गांधी उद्यानासंदर्भात देखील काही सुधारणा श्री. अरुण कुंभार यांनी आयुक्तांना केल्या त्यांच्या सूचनांचा आयुक्तांनी सकारात्मक स्वागत केले. महिला जिल्हाध्यक्ष निर्मला म्हात्रे यांनी आयुक्तांना पनवेल महानगरपालिकेच्या संदर्भात प्रमुख सात मागण्यांच्या बाबतीत चर्चा केली आणि आयुक्तांनी संबंधित मागण्यांना पुरेसा वेळ देऊन सूचना चांगल्या आहेत असे देखील त्यांना सांगितले. सदर बैठकीमध्ये खारघर ब्लॉक अध्यक्ष जॉय जी तसेच महिला उपाध्यक्ष इशिका मॅडम यांनी देखील खारघर मधील अनेक समस्या त्या ठिकाणी मांडल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव श्रुती म्हात्रे यांनी सार्वजनिक उद्यानामध्ये मोबाईल टॉवर संदर्भात होत असलेल्या चुका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या त्याचेही त्यांनी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये नोंद केली आहे. हेमराज जी म्हात्रे यांनी केलेल्या मागणीला येत्या काहीच दिवसात यश येईल यात काही शंका नाही. केस पाटील साहेबांनी देखील नवीन पनवेल येथे असलेल्या समस्यांचा आयुक्तांना सादरीकरण केले. 

सदर बैठक पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम जी पाटील यांनी संपूर्ण महापालिकेतील तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या मागणी चे खूप सुंदर असे सादरीकरण करून पनवेल शहर जिल्हा काँग्रेस च्या वतीने वरील सर्वच मागण्या चे निवेदन महापालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे साहेब यांना देण्यात आले.

(पनवेल प्रतिनिधी सागर पगारे )

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे