0
0
2
6
4
7
सुनील गायकवाड
समाजाला समजून घेणारा आंबेगाव तालुक्यातला वटवृक्ष हरपला!
जगन दादा अंकुश यांचे निधन…
नवी मुंबई प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील विशेष म्हणजे मावळ पट्ट्यातील अतिशय दुर्गम भागामध्ये राहून ज्याने सामाजिक कार्य केले अशातलेच एक दिवंगत नेते पॅंथर मनोहर अंकुश यांचे धाकटे बंधू जगन दादा अंकुश यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथील भारती रुग्णालयात गुरुवारी 3:45 दुपारच्या दरम्यान दुःखद निधन झालेले आहे मृत्यू समयी त्यांचे वय (70) इतके होते.
जगन दादा अंकुश हे पुण्यातील आपल्या मुलीकडे गेले असता अचानक त्यांच्या छातीमध्ये वेदना होऊ लागल्याने त्यांना पुण्यातील भारती रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यानच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मलावली. त्यांच्या पश्चात मुले नातवंडे पत्नी असा परिवार आहे
जगन दादा अंकुश यांचे कार्य समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत होते या मावळ पट्ट्यांमध्ये विशेष करून महादेव कोळी व बौद्ध समाज या समाजाची लोक वस्ती मोठ्या प्रमाणात आहे या दोन्ही समाजाला आनंदाने गुना गोविंदाने एकत्रित आणण्याचे काम जगन दादा अंकुश हे करत होते समाजा मध्ये अतिशय प्रेरणादायी असे काम त्यांनी केलेले आहे भीमाशंकर येथील लिंबूनि बुद्ध विहार या विहाराचे संस्थापक व अध्यक्ष या पदावरती ते विराजमान होते. त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घरगुती भांडणे अथवा जमिनीचा वाद इत्यादी प्रकारचे भांडणे जर होत असतील तर ती भांडणे गोडी गुलाबीने सोडविण्याचा त्यांचा हातखंडा होता समाजाबद्दल आदर युक्त भावना असणारा नेता हरपल्याने समाजातील बौद्ध बांधवासह आंबेगाव तालुक्यातील सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केलेली आहे.
दरम्यान त्यांचा अंत्यविधी शुक्रवारी साडेबाराच्या दरम्यान त्यांच्या मूळ गावी माळीन येथे भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत अश्रू ढाळीत समाजातला सामाजिक कार्यकर्ता हरपला याबद्दल खंत आणि शोक व्यक्त करण्यात आला
आंबेगाव तालुक्यातील गावांमध्ये त्यांचा जनसंपर्क दांडगा होता त्यांच्या पुढाकाराने आंबेगाव तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असेल तालुक्यातील प्रत्येक जयंतीमध्ये त्यांचा सहभाग कायमचा असायचा जगन दादा अंकुश यांचे शिक्षण बी कॉम पर्यंत होते.
सुनील गायकवाड
0
0
2
6
4
7