Breaking
राजकिय

आज टिळक भवन, मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षात शहीद लोकनेते विजय वाकोडे बाबा यांचे चिरंजीव पुत्र,श्री आशिष विजय वाकोडे यांचा पक्षप्रवेश

पनवेल प्रतिनिधी. सागर पगारे

0 0 2 6 4 7

आज टिळक भवन, मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षात शहीद लोकनेते विजय वाकोडे बाबा यांचे चिरंजीव पुत्र,श्री आशिष विजय वाकोडे यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांनी देखील सक्रियपणे राष्ट्रीय काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला.

या कार्यक्रमात श्री.आशिष वाकोडे यांनी आपल्या बाबांच्या पुण्यस्मरणात, त्यांच्या आदर्शांनुसार लोकसेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी राष्ट्रासाठी आणि जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा मनोमन संकल्पही यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री.हर्षवर्धनजी सपकाळ यांनी आशिष वाकोडेंच्या पक्षप्रवेशाचे महत्त्व अधोरेखित करत, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार होईल आणि जनतेपर्यंत पक्षाचा प्रभाव वाढेल,अशी आशा व्यक्त केली.

यावेळी खासदार व अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य श्री.चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार श्री.तुकाराम रेंगे पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव मुजाहिद खान, परभणी शहर जिल्हा अध्यक्ष नदीम इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

पनवेल प्रतिनिधी. सागर पगारे
5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे