Breaking
ब्रेकिंग

रबाले पोलीस ठाण्यात स्वयंघोषित धार्मिक गुरु स्वामी आनंद स्वरूप यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल !

 नवी मुंबई प्रतिनिधी - सुनील गायकवाड.

0 0 2 8 3 7

रबाले पोलीस ठाण्यात स्वयंघोषित धार्मिक गुरु स्वामी आनंद स्वरूप यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल.

 भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आपल्या अकलेचे तारे तोडून समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या स्वयंघोषित धार्मिक गुरु स्वामी आनंद स्वरूप यांच्या वरती रबाले पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे 

 स्वयंघोषित धार्मिक गुरु स्वामी आनंद स्वरूप यांनी केलेल्या आक्षेपार्ह आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील आंबेडकरी समाजातील राजकीय व सामाजिक कार्यात असलेल्या समाज बांधवांनी ही भूमिका मांडून राबले पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे. या स्वयंघोषित गुरुने भोंदू अशोक खरात यांच्या संदर्भात बोलताना “महार जातीचा शूद्र” असा अवमानकारक उल्लेख केला, तसेच “आंबेडकर बिरादरी के जितने भी लोग है उनका कर्म उनका चरित्र कुकर्मी है” असे विधान करत संपूर्ण आंबेडकरी समाजावर गंभीर आरोप केले. ही विधाने केवळ एका समाजाचा अपमान नसून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा स्पष्ट प्रयत्न असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. ही बाब थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आघात करणारी असून संविधानिक मूल्यांना आव्हान देणारी आहे. त्यामुळे संबंधितांवर अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

 दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय, कोपरखैरणे येथे झालेल्या ठिया आंदोलनानंतर प्रशासनाने दखल घेतली. उपायुक्त पंकज डहाणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

“आंबेडकरी समाजाचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. संविधानिक मूल्यांवर घाला घालणाऱ्यांविरोधात कायद्याच्या चौकटीत राहून तीव्र लढा उभारला जाईल. “ही केवळ भावना दुखावण्याची बाब नसून कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. संबंधितांवर कठोर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”

 सचिन कटारे 

रिपब्लिकन पक्ष आठवले गट प्रवक्ते 

या आंदोलनात ॲड. स्वप्निल जगताप, ॲड. अमोल उघाडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्वजित जगताप, मल्लिनाथ सोनकांबळे, राजेश भालेराव, रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोडसे, मयूर भोसले, भारतीय बौद्ध महासभेचे रविंद्र सदाफुले, मल्हारी शिंदे, लोखंडे,, ॲड. शैलेश लाटकर, ॲड. सौरव मोरे, भीम आर्मीचे प्रकाश पाईकराव, व इतर आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे