Breaking
ब्रेकिंग

 रबाले पोलिसांची यशस्वी कारवाई !

 नवी मुंबई प्रतिनिधी- सुनील गायकवाड.

0 0 2 8 3 7

रबाले पोलिसांची यशस्वी कारवाई तीन चोरट्यांना केले गजाआड ! 

 चोरट्याने चोरलेले दागिने पोलिसांनी केले हस्तगत !

नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीमध्ये रबाले पोलिसांनी यशस्वी अशी कामगिरी केली असून तीन चोरट्यांना रबाले पोलिसांनी गजाआड करण्यास यश प्राप्त केले आहे या चोरट्यांनी महिलांना लक्ष करून त्यांच्या अंगावरील दाग दागिने जबरीने चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या याबाबत रबाले पोलीस ठाण्यात या अज्ञात चोरट्यांच्या बाबतीत गुन्हे दाखल करण्यात आले होते 

 दिनांक २४/०३/२०२६ रोजी फिर्यादी निर्मला शांताराम पवार या पहाटेच्या वेळी रस्त्याने एकटया रस्त्याने जात होत्या त्यावेळी या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून चोरी केली होती  

 याबाबत रबाळे पोलीस ठाणे गु.र.नं. २६०/२०२६ बी.एन.एस. कलम ३११, ३०९ (६), ३१७ (२) (५), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता 

 सदरची घटना साईनाथवाडी सेक्टर-१, ऐरोली नवी मुंबई या ठिकाणी घडली होती आरोपींनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याची पोत त्यांच्या हातामधील पिशवी आधार कार्ड मोबाईल व रोख रक्कम ७ हजार असा एकूण ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जबरीने हीसकावून पळ काढलेला होता 

तर दुसऱ्या घटनेमध्ये फिर्यादी जेन्सीबाई हरिश्चंद नाडार, वय वर्ष (४०) राहणार तळवली गाव या फिर्यादीशी झटापट करून तिच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र या चोरट्यांनी तिला किरकोळ जखमी करून चोरून नेल्याची घटना घडली होती याबाबत रबाले पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८०/२०२६ बी.एन.एस. कलम ३११, ३०९ (६), ३१७(२) (५), ३(५) याप्रमाणे गुन्हा दाखल होता तर तिसऱ्या घटनेमध्ये 

 फिर्यादी यमुना बाळाराम भोईर वय वर्ष (७२) राहणार ऐरोली गाव या फिर्यादीच्या गळ्यातील २ तोळे सोन्याची जीरामाळ बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडलेली होती याबाबत रबाळे पोलीस ठाणे गु.र.नं. २८१/२०२६ बी.एन.एस. कलम ३११, ३०९ (६), ३१७ (२) (५), ३ (५) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या चोरट्यांनी एकूण ४ लाख २३ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडलेली होती

 दरम्यान : सदर गंभीर गुन्हा उघडकीस आणणेबाबत पोलीस आयुक्त, श्री. मिलिंद भारंबे , पोलीस सह आयुक्त, श्री. संजय येनपुरे अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. दिपक साकोरे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त, परि-१ श्री. पंकज डहाणे , सहा. पोलीस आयुक्त श्री. राहुल धस रबाळे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सचिन गवळी, पोलीस निरीक्षक (प्रशासन), शाम बनसोडे यांचे सुचनांप्रमाणे तपास सुरू केला होता 

या गुन्ह्याच्या पोलीस पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड यांनी आरोपींना ताब्यात घेत पोलीस खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्हा केल्या असल्याची कबुली दिलेली आहे या आरोपींची नावे नावे १) आयुष अर्जुन देटके, वय २२ वर्षे, रा. रूम नंबर ५, एलआयजी सोसायटी, सेक्टर ८, नेरुळ, नवी मुंबई २) अपर्णा संदीप आवळे, वय ३९ वर्षे, रा. लिंबुनी बाग केना मार्केट, सिध्दार्थ उदयान, इंदिरा नगर, गोवंडी, मुंबई ३) अर्जुन बाबु चव्हाण, वय ४१ वर्षे, धंदा-सिव्हील काम, रा. रूम नं. २१, श्री गणेश चाळ कमिटी, महात्मा फुले नगर, रेल्वे स्टेशन जवळ, मानखुर्द, मुंबई ४) तखतसिंग प्रेमसिंग राठोड, वय ४७ वर्षे, व्यवसाय ज्वेलर्स, रा. रूम नं. १०२, ए विंग, मंगलमुर्ती बिल्डींग क्रमांक ११, मानखुर्द, मुंबई अशी आहेत

आरोपी अविनाश सुनिल शिशुपाल, वय-२१ वर्षे, रा. चेंबुर, मुंबई २. अनिकेत सुनिल शिशुपाल, वय-२३ वर्षे, रा. चेंबुर, मुंबई व ३. मोहम्मद इरफान मोहम्मद शेख, वय २० वर्षे, रा. गोवंडी, मुंबई हे फरार असून रबाले पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत 

 आरोपीतांकडून हस्तगत मालमत्ता. १) १५,०००/- रूपये किंमतीचे १ ग्रॅम वजनाचे १४ सोन्याचे बारीक मणी २) ९१,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्रातील कडीचा ७ ग्रॅम वजनाचा तुटलेला भाग ३) ५०,०००/- रू.किं.ची एक पिस्ता रंगाची सुझुकी कंपनीची अॅक्सेस मोटार स्कुटी ४) ००.००/- रू किमंतीचा काळया रंगाचा चाकू पोलिसांनी जप्त केला असून अटक आरोपीत सध्या पोलीस कोठडीत आहेत 

गुन्हयातील पाहीजे आरोपीत इसमांचा व उर्वरित मालमत्ता बाबत तपास अधिकारी पोउपनि राहुल गरड हे करीत आहेत.

सदरची कारवाई यशस्वी करण्यासाठी व पोहवा / १०२ भोसले, पोहवा/२३३० वायंगणकर, पोना / ३४४७ करंकाळ, पोशि/३२५२ साळुंखे, पोशि/ ३८९७ राळे, पोशि/३२०४ तडवी यांनी मेहनत घेतली असून केला घटनास्थळी असलेले सीसीटिव्ही कॅमेरे चेक करून आरोपीतांचे फुटेज प्राप्त केले. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासव्दारे तसेच घणसोली, कोपरखैरणे, वाशी, मानखुर्द, चेंबुर, गोवंडी, शिवाजीनगर, छेडानगर, घाटकोपर येथिल जवळपास १२० ते १३० सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी करुन आरोपींची नावे निष्पन्न करून अटक केली आहे 

आरोपीत यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करून जबरीने चोरलेले सोनसाखळी व गुन्हयात वापरलेले हत्यार व मोटारसायकल हस्तगत करण्यात आले आहे..

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे