Breaking
राजकिय

मुंबई येथे काँग्रेस पक्षाचे संघटन सृजन अभियान.

पनवेल प्रतिनिधी - सागर पगारे.

0 0 2 7 7 0

आज टिळक भवन, मुंबई येथे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार जिल्हा काँग्रेस कमिट्या सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी संघटन सृजन अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानातून राष्ट्रीय पातळीवरील नेते जिल्ह्यात जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे, यासोबतच तालुका, मंडल स्तर तसेच ग्राम स्तरापर्यंतच्या नियुक्त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करणार आहे. संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात असून हे वर्ष संघटन वर्ष आहे, अशी भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी यावेळी मांडली.

या बैठकीला माझ्या सह,विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. श्री. विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य मा. श्री. बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी, आ. डॉ. विश्वजीत कदम, श्री. रणजित कांबळे, खा. प्रणिती शिंदे, खा. डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शोभा बच्छाव, खा. श्री. बळवंत वानखेडे, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष श्री. विलास औताडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. शिवराज मोरे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव श्री. सचिन सावंत, वरिष्ठ प्रवक्ते श्री. अतुल लोंढे,अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष माजी आ. वजाहत मिर्झा यांच्यासह नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

(पनवेल प्रतिनिधी – सागर पगारे )

 

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 7 7 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे