
रबाळे पोलिसांची मोठी कारवाई.
01 गावठी कट्टयासह दोन जिवंत राऊंड हस्तगत, दारू आणि गुटखा विक्रेत्यांच्या वरती देखील कारवाई.
एकुण 14 आरोपीवर गुन्हे दाखल!
नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील रबाले पोलीस ठाण्याने विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविले होते त्यात एक गावठी कट्टा दोन जिवंत राऊंड हस्तगत करण्यात राबळे पोलिसांना यश आले असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाच्या मुस्क्या आवळण्यात आलेल्या आहेत
या विशेष मोहिमेमध्ये अमली पदार्थ विक्री करणारे अमली पदार्थाचे सेवन करणारे अवैद्य दारू विकणारे जुगार क्लब अशा विविध ठिकाणी रबाले पोलिसांच्या माध्यमातून ठिकठिकाणी धाडी टाकून एकूण 14 आरोपींच्या विरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे (परिमंडळ-१) यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली रबाळे पोलीस स्टेशन हद्दीत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर मोहिमेत परिमंडळ-१ मधील 7 पोलीस स्टेशनमधील 04 पोलीस निरीक्षक, 16 सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) व 184 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला होता
दरम्यान : हे कॉम्बिंग ऑपरेशन नोसिल नाका, अर्जुनवाडी, घनसोली साईनाथवाडी व रबाळे परिसरात राबविण्यात आले. पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांच्या झिरो टॉलरन्स धोरणानुसार अमली पदार्थ विक्री व सेवन करणारे गुन्हेगार, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री, जुगार क्लब अशा अवैध धंद्यांवर एकाच वेळी मास रेड करून कठोर कारवाई करण्यात आली. यावेळी अवैध बांगलादेशी व नायजेरियन नागरिकांची तपासणी, फरारी व पाहिजे आरोपींचा शोध, हॉटेल व लॉजेस मधील संशयास्पद व्यक्तींची तपासणी, नाकाबंदी करून वाहन तपासणी तसेच वॉरंट बजावणी अशा विविध कारवाई करण्यात आल्या आहेत
या मोहिमे अंतर्गत पोलिसांच्या रेकॉर्ड वरती असलेले आरोपींचा देखील समावेश आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अवैध धंद्यांविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणानुसार पुढील काळातही अशा प्रकारच्या कॉम्बिंग मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहे
सदर कामगिरी ही पोलीस आयुक्त, नवी मुंबई श्री. मिलींद भारंबे यांचे आदेशान्वये मा. पोलीस उप आयुक्त परि.01 श्री. पंकज डहाणे साहेब, मा. सहा. पोलीस आयुक्त, रबाळे विभाग श्री. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक श्री. सचिन गवळी, परि. 01, 1, 3 कडील तसेच पोलीस मुख्यालयाकडील अधिकारी व अमंलदार यांनी एकत्रीत मिळून संयुक्तीरित्या केलेली आहे..



