Breaking
ब्रेकिंग

रायगड जिल्हा परिषदेला पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष; मंगेश वाकडीकर बिनविरोध.

पनवेल प्रतिनिधी - सागर पगारे.

0 0 2 7 5 9
रायगड जिल्हा परिषदेला पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष; मंगेश वाकडीकर बिनविरोध.
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मंगेश रामचंद्र वाकडीकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर मारूती पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष निवडून आल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. भाजपला १५, राष्ट्रवादी काँग्रेसला १६, शिवसेना (शिंदे गट) २१, शिवसेना (ठाकरे गट) ५ आणि काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने एकत्र येत महायुतीची सत्ता स्थापन केली. अध्यक्षपदासाठी भाजपकडून पनवेलचे मंगेश वाकडीकर, तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहा येथील मधुकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी (दि. १२) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. या सभेत अपर जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी सुनील थोरवे यांनी वाकडीकर आणि पाटील यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
या वेळी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे, अ‍ॅड. आस्वाद पाटील, वैकुंठ पाटील, चित्रा पाटील, मानसी दळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीची घोषणा होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी व जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.                                                                 पनवेल प्रतिनिधी – सागर पगारे.
5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 7 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे