Breaking
ब्रेकिंग

घणसोली महानगरपालिका गार्डन विभाग, ठेकेदार टेन कंट्रक्शन च्या कामगारांवर उपासमारीची वेळ!

सुनील गायकवाड.

0 0 2 6 4 7

घनसोली विभागात कार्यरत असलेल्या गार्डन कर्मचाऱ्यांचा पगार तात्काळ द्या स्वराज्य शक्ती सेनेची मागणी!

नवी मुंबई प्रतिनिधी

नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे अनेक कामे ठेकेदारांच्या माध्यमातून सुरू असतात मात्र ही कामे सुरू असताना आपला जीव धोक्यात घालून कर्मचारी वर्ग राबतांना दिसत आहे या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन न मिळाल्याने स्वराज्य शक्ती सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष भारत महापूरकर यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. घनसोली प्रभाग अंतर्गत गार्डन विभाग कार्यरत आहेत गार्डन विभागाचे कर्मचारी उंच उंच वृक्षावर चढून झाडांच्या फांद्याची छाटणी करत आहे ज्यावेळी एक कर्मचारी एखाद्या वृक्षावर जाऊन छाटणी करत असतात त्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला नक्कीच धोका असतो मात्र या धोक्याची परवा न करता नवी मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे कर्मचारी आपले प्रामाणिकपणे काम करत आहेत मात्र या कर्मचाऱ्यांचे वेतन दोन महिने उलटून गेल्याने देखील त्यांचे वेतन आज पर्यंत मिळाले नाही याची माहिती मिळताच स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्ष भारत महापूरकर आक्रमक झालेले आहेत त्यामुळे महानगरपालिकेने ठेकेदारांना वेळीच त्यांची असणारी रक्कम देऊन कामगारांचा पगार भागवावा अशा प्रकारची मागणी ते महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्याकडे करणार आहेत

दरम्यान भारत महापूरकर यांनी कामगारांच्या सोबत वृक्षावर फांद्या छटताना त्यांचे कामकाज पाहिलेले आहे त्यामुळे महानगरपालिकेने या कामगारांची योग्य दखल घेऊन त्यांच्या असणारे समान वेतन त्वरित अदा करावे अन्यथा स्वराज्य शक्ती सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाहीत.

घणसोली महानगरपालिकेच्या वतीने टेन कंट्रक्शन ला गार्डन विभागाचा ठेका दिलेला आहे मात्र या टेन कंस्ट्रक्शनच्या ठेकेदारांनी दोन महिन्यापासून कामगारांचे वेतन दिलेले नाही त्यामुळे कामगारांच्या वर उपासमारीची वेळ आल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

मनोहर शिवपुजे

सामाजिक कार्यकर्ता नवी मुंबई

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे