Breaking
ब्रेकिंग

कर्तव्य दक्ष वरिष्ठ पोलीस निरक्षक सुनील वाघमारे यांनी दिला पत्रकारांना न्याय.!

0 0 2 6 4 7

    नवी मुंबई प्रतिनिधी  –   सुनील गायकवाड 

“दैनिक आदर्श” महाराष्ट्राचा आवाज एमआयडीसी पोलिसांना पोचला!..

कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरक्षकांनी  हल्लेखोरांवर केले गुन्हे दाखल!.. 

नवी मुंबईतील साप्ताहिक लोकदाता या संपादकावर रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत साईबाबा नगर या ठिकाणी गावठी दारू व देशी दारू विक्रेत्या महिलांनी व त्यांच्या गुंडांनी प्राणघातक हल्ला केला होता या हल्ल्याची बातमी पोलीस दादा… पोलीस दादा… पत्रकारांनी निर्भीड पत्रकारिता करायची कशी? अशा मथळ्याखाली बातमी प्रसारित केली होती त्या बातमीची गंभीर दखल घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष वरिष्ठ पोलीस निरक्षक सुनील वाघमारे यांनी हल्लेखोर आरोपींवर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामुळे पत्रकारांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांचे अभिनंदन केलेले आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी लोक दाता या साप्ताहिकाचे संपादक दिलीप काकनाटे यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये बातमी प्रसारित करून हे अवैद्य दारूचे धंदे बंद करण्यासाठी रबाले पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती त्यात तक्रारीची चौकशी सुरू असताना हल्लेखोरांनी दिलीप काकनाटे यांच्या घरात घुसून त्यांना रक्तबंबाळ केले होते त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांनी एफ आय आर दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र मारहाणी मध्ये घायाळ झालेला संपादक काकनाटे यांना एफ आय आर आणि एनसी मधला फरक न समजल्याने ते सतत एनसी घ्या.. अशा प्रकारचे बोलत असल्याने पोलिसांनी त्याबाबतची कारवाई केली.

 मात्र सदरचा गुन्हा अदखल पात्र स्वरूपाचा नसून दखलपात्र गुन्हा आहे याची जाणीव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांना झाल्याने त्यांनी तात्काळ संपादक दिलीप काकानाटे यांना बोलवून एफ आय आर नोंदवून घेतलेला आहे 

 दरम्यान: पत्रकारांवर हल्ले करणे म्हणजेच लोकशाहीची हत्या करण्यासारखेच आहे त्यामुळे विविध वर्तमान पत्राच्या पत्रकारांनी रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांची भेट घेऊन हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली आहे त्यात पुण्यनगरीचे विजय गायकवाड, निर्भीड आमदार चे मनोहर शिवपुजे, विश्व सम्राट चे वसंतराव वाघमारे, दत्तात्रय सूर्यवंशी, लोक दृष्टीचे नितीन पडवळ, इत्यादी पत्रकारांनी रबाले पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केले होती.  

फिर्यादी दिलीप काकनाटे यांच्यावर जो हल्ला झाला त्या संदर्भात मी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र दिलीप काकनाटे एनसी घ्या एनसी घ्या अशाच प्रकारे बोलत असल्याने पोलिसांनी तशा प्रकारे तक्रारदार काकनाटे यांची तक्रार घेतली मात्र सदर गुन्हा दाखल पात्र स्वरूपाचा नसून दखलपात्र स्वरूपाचा आहे याची मला खात्री झाल्याने आज मी दखलपत्र गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या असून तसा कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे 

 वरिष्ठ पोलीस निरक्षक सुनील वाघमारे यांनी हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हा दाखल केल्याने आम्हा पत्रकारांना न्याय मिळाला असे आम्ही मानतो.

नवी मुंबईतील पत्रकारी क्षेत्रात कार्यरत असलेले पत्रकार

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे