आज महाविकास आघाडीच्या वतीने पनवेल महानगरपालिकेवर जनतेची दिशाभूल करून शास्ती माफी करण्याऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या विरोधात पोल खोल धडक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथून पनवेल महापालिकेवर पोल खोल धडक मोर्चा काढण्यात आला. पनवेल महापालिकेची शास्ती माफीची योजना म्हणजे भुलभुलैया असल्याचा आरोप तसेच मालमत्ता आमचा हक्क आहे, उपकार नाही! जोपर्यंत हा हक्क कायद्यानं आणि न्यायानं मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. असा निर्धार यावेळी करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त श्री. मंगेश चितळे साहेब यांची महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन कर माफीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अन्यथा महाविकास आघाडी कडून ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सुरेन्द्रनाथ (बाळ) माने, माजी आमदार (म.वि. आ) अध्यक्ष बाळाराम पाटील, उपनेते बबनदादा पाटील, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख-रायगड शिरीष घरत, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे, शिवसेना जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, मनसेचे प्रवक्ते योगेश चिल्ले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका प्रमुख संदीप तांडेल, ज्ञानेश्वर बडे, महानगर प्रमुख अवचित राऊत, युवासेना जिल्हाअधिकारी पराग मोहिते, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, प्रवीण जाधव, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, सूर्यकांत म्हसकर, रामदास गोवारी, प्रदीप केणी, काँग्रेस चे जेष्ठ नेते कॅप्टन कलावत, शेकापचे प्रकाश म्हात्रे, अँड. विजय गडगे, समाज वादि पार्टी चे अनिल नाईक , महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका, सौ. रेवती सकपाळ, प्रभारी विधानसभा अधिकारी अजय पाटील, विधानसभा समन्वयक अरविंद कडव, तालुका अधिकारी मनोज कुंभारकर, महानगर अधिकारी महेश भिसे, महानगर चिटणीस जीवन पाटील, महानगर समन्वयक जय कुष्टे, शहर अधिकारी निखिल भगत, तेजेष पाटील, सौ. अनीता डांगरकर, सौ. भावना घाणेकर, उपशहर प्रमुख सनी टेमघरे, प्रशांत नरसाळे, विभागप्रमुख अमित माळी, अमोल गोवारी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल प्रतिनिधी सागर पगारे.