Breaking
ब्रेकिंग

रबाले पोलीस ठाण्याच्या सतर्कमुळे अपहरण झालेल्या इसमाचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा बेत हुकला.

नवी मुंबई प्रतिनिधी- सुनील गायकवाड

0 0 2 6 4 7

रबाले पोलीस ठाण्याच्या सतर्कमुळे अपहरण झालेल्या इसमाचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा बेत हुकला…

कार चालकाला पोलिसांनी केली अटक इतर आरोपी फरार!

मिक्सर ट्रक चा धक्का एका कारला लागल्याने संतप्त झालेल्या कार चालकाने व कारमालकाने मिक्सर डंपर च्या कामगाराला आपल्या गाडीमध्ये कोंबून त्याचे अपहरण केले होते याबाबतची फिर्याद रबाले पोलीस ठाण्यात करण्यात आली होती रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी या अपहरण झालेल्या मिक्सर ट्रक च्या कामगाराचा त्वरित शोध घेऊन त्याची सुटका करा अशा सूचना गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात यांना केल्या होत्या त्यानुसार दीपक खरात यांच्या पथकाने सदर सूचनेचे पालन करीत अपहरण झालेल्या मिक्सर ट्रक वरील कामगाराची पुणे शहरातील घर क्रमांक 112 नॅशनल हाऊसिंग सोसायटी औंध पुणे येथून सुखरूप सुटका केल्याने होणारा पुढील अनर्थ टळला आहे अन्यथा या मिक्सर ट्रक कामगाराचा करेक्ट कार्यक्रम करण्याची योजना कारचालक व त्यांच्या मालकांनी आखली असल्याचे समोर आलेले आहे.

याबाबत माहिती अशी आहे की दिनांक  

13/0 9/2025 रोजी सायंकाळी 19:15 वाजण्याचे सुमारास मुलुंड ते ऐरोली हायवे लेनवरील मॅकडोनाल्ड सिंग्नल जवळ ऐरोली येथे ट्रान्झीट मिक्सर ट्रक MH 46 CU 2738 व लॅन्ड कुझर कार कमांक MH 12 RP 5000 यांचेमध्ये झालेल्या अपघातामध्ये कारचे नुकसान झाले होते त्या बदल्यात कार चालकाने व कार मालकाने कार दुरुस्तीची भरपाई मागितली होती ती न दिल्याने कारच्या मालकाने आणि कारचालकाने मिक्सर ट्रकच्या कामगाराचे अपहरण केले होते या कामगाराचे नाव प्रल्हादकुमार चौहान असे आहे याबाबत मिक्सर ट्रक डंपर मालक विलास धोंडीराम ढंगरे रा. खारघर, नवी मुंबई यांचे फिर्यादी वरून रबाळे पोलीस ठाणे गुरजि.नंबर 668/2025 बी.एन.एस कलम 137 (2) प्रमाणे दिनांक 14/09/2025 रोजी 05:12 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार रबाले पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी अपहरण झालेल्या कामगाराची सुखरूप सुटका केलेली होती मात्र या गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेले कारचालक व कारमालक फरार होते त्यातील कार चालकाला गोपनीय बातमीदाराच्या आधारे रबाळे पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत या कारचालक आरोपीचे नाव प्रफुल ज्ञानेश्वर साळुंखे असे असून त्याला सिंदखेड जिल्हा धुळे येथून रबाळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या आरोपीला बेलापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 23 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलीस रिमांड दिलेला आहे. या गुन्ह्यातील आरोपी दिलीप कोंडीबा खेडकर व मनोरमा खेडकर हे फरार असून पोलीस त्यांच्या कसून शोध घेत आहेत. फरार असलेले आरोपी हे दिव्यांग आरक्षणातून लाभ घेतल्याने वादग्रस्त असलेल्या आयपीएस अधिकारी पूजा खेडकर यांचे आई-वडील आहेत 

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय ऐनपुरे, पोलीस उप आयुक्त श्री. पंकज डहाणे (परिमंडळ-01 वाशी), सहायक पोलीस आयुक्त राहुल धस (रबाळे विभाग) यांनी अपहरण झालेल्या इसमाचा व आरोपीत यांचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या 

अपहरण इसमाकडे केलेल्या अधिक तपासमध्ये त्यास लॅन्ड कुझर कार कमांक MH 12 RP 5000 वरील चालक व मालक दिलीप खेडकर यांनी त्याचा वापरता मोबाईल फोन काढुन घेतला, त्यास शिळे अन्न खाण्यास दिले, वॉचमन व कुक रूम यांचे रूममध्ये कोंडुन ठेवले व कारचे नुकसानाचे मालकाचे पैसे नाही दिले तर त्याचा कार्यकम करण्याचे भाष्य केले असल्याचे सांगितले. त्यामुळे नमुद गुन्हयात भा.न्या. सं कलम 137 (2), 115(2), 127(7), 308(4), 3(5) वाढ केले होते.

घर नंबर 112 नॅशनल हौसींग सोसायटी येथे असलेले सीसीटिव्ही कॅमेरेचे फुटेज हा नमुद गुन्हयातील महत्वाचा पुरावा असल्याने आरोपीत मनोरमा खेडकर यांनी पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने एक इसमाकडे तिचे बेडरूमची चावी देवुन बेडरूम मधील चेजिंग रूममध्ये असलेला चालु स्थितीतील डीव्हीआर मशीन काढुन नेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नमुद गुन्हयात बी.एन.एस कलम 238 (3) वाढ केले आहे. नमुद गुन्हयात मनोरमा दिलीप खेडकर व डीव्हीआर काढुन नेणा-या इसमाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

रबाले पोलीस तपास अधिकारी  दरम्यान: 

19/09/2025 रोजी सपोनि / अविनाश पाळदे यांचे पथकाने तांत्रिक विष्लेशन व गोपनीय बातमीदार यांचेकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त करून लॅन्ड कुझर कार कमांक MH 12 RP 5000 वरील चालक आरोपी प्रफुल्ल ज्ञानेश्वर सांळुखे यास शिंदखेडा जि.धुळे येथुन ताब्यात घेवुन अटक केली आहे. या कामी पोलीस हवालदार प्रसाद वायंगणकर, पोलीस नाईक विजय करंकाळ, पोलीस शिपाई राहुल साळुंखे, पोलीस शिपाई अभिजीत राळे, पोलीस शिपाई राजेश तडवी, पोलीस शिपाई प्रवीण भोपी, पोलीस नाईक प्रल्हाद जाधव, या टीमने उत्कृष्ट कामगिरी करून या आरोपीला अटक केलीआहे.

  आरोपी दिलीप कोंडीबा खेडकर, मनोरमा दिलीप खेडकर व इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/दिपक खरात हे करीत आहेत.

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे