सुनील गायकवाड
कोपरखैरणे येथे बांधण्यात आलेले नवीन पोलीस ठाण्याला मुहूर्त कधी मिळणार ? एक मजली इमारत बांधण्यासाठी चार वर्षे लागतात का? नागरिकांचा सवाल!
नवी मुंबई प्रतिनिधी
कोपरखैरणे पोलीस ठाण्याला स्वातंत्र्य आणि मालकीचे पोलीस स्टेशन सिडकोच्या जागेवर मिळालेले आहे मात्र या पोलीस ठाण्याला नागरिकांच्या तक्रारी मांडण्यासाठी अथवा मिटवण्यासाठी बांधले गेलेले सुसज्ज पोलीस ठाण्यात जाण्यासाठी पोलीस अधिकारी व नागरिकांना कधी मुहूर्त मिळणार अशा प्रकारची चर्चा होऊ लागलेली आहे सध्याचे पोलीस स्टेशन हे वादग्रस्त इमारतीच्या जागेवरती आहे त्या इमारतीच्या जागेवर कोर्टात केस प्रालंबित असल्याचे समजते यापूर्वी कोपरखैरणे सेक्टर सहा या ठिकाणी भाडेतत्त्वावर पोलीस ठाणे होते मात्र सदरच्या जागेवर बांधलेले बांधकाम हे जीर्ण झाल्याने पावसाळ्याच्या दरम्यान त्या पोलीस ठाण्यात पावसाचे पाणी स्लॅपमधून टपकत असल्याने त्या ठिकाणाहून पोलीस स्टेशन स्थलांतरित करून घणसोली आणि कोपर खैरणेच्या मध्यभागी वादग्रस्त इमारतीमध्ये हलविण्यात आले त्यानंतर कोपरखैरणे येथील पूर्वीचे वाहतूक शाखा असलेल्या ठिकाणी सिडको विभागाने पोलीस ठाण्याला जागा उपलब्ध करून दिली त्याच जागेवर गेल्या चार वर्षापासून बांधकाम सुरू असून आतापर्यंत सिडकोणे अथवा सबंधित विभागाने सदरचे बांधण्यात आलेले पोलीस ठाणे हे नागरिकांच्या हितासाठी कोपरखैरणे पोलिसांच्याकडे हस्तांतरित केलेले नाही. बांधकाम पूर्ण होऊन देखील सिडको विभाग नागरिकांसाठी बांधण्यात आलेले पोलीस ठाणे कोपरखैरणे पोलिसांच्याकडे हस्तांतरित करण्यासाठी विलंब का लावते अशा प्रकारचा सूर नागरिकाकडून ऐकण्यास मिळत आहे.
ज्यावेळी सिडको विभाग एखाद्या ठेकेदाराला एखादे बांधकामाचे काम देते ते काम दिलेल्या वेळेनुसार पूर्ण न केल्यास ठेकेदारावर काही प्रमाणात दंड आकारण्यात येत असल्याचे समजते मग कोपरखैरणे पोलीस ठाणे बांधण्यासाठी किती वर्षाचा अवधी सिडको विभागाने दिला होता व त्यास गृह विभागाने अथवा संबंधित विभागाने किती निधी दिलेला आहे असा फलक त्या ठिकाणी दिसून येत नाही त्यामुळे वेळेवर काम न करणाऱ्या ठेकेदारावर काही दंडात्मक कारवाई झाली का? हे मात्र गुलदस्त्यात आहे. एक मजली इमारत बांधण्यासाठी चार वर्षाचा अवधी सिडको विभागाने ठेकेदाराला दिला आहे का? कि ठेकेदाराला मनमर्जीप्रमाणे काम करण्याची मुभा सिडकोणे दिली असल्यास तसे जाहीर करावे
गजानन जाधव
सामाजिक कार्यकर्ता.