Breaking
ब्रेकिंग

काही वरिष्ठ पोलीस निरक्षकांचा पदोन्नतीस नकार का ?

नवी मुंबई प्रतिनिधी - सुनील गायकवाड.

0 0 2 6 4 7

पोलीस खात्यात सहाय्यक पोलीस आयुक्त पद मोठे की वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद मोठे? काही वरिष्ठ पोलीस निरक्षकांचा पदोन्नतीस नकार का?

प्रत्येक सरकारी अथवा खाजगी नोकरदार क्षेत्रामध्ये नोकरी लागल्यानंतर प्रत्येक नोकरदार वर्ग आपली पदोन्नती झाली पाहिजे या दृष्टिकोनातून झटत असतो आपल्याला पुढील पदावर पदोन्नती मिळाली पाहिजे या दृष्टीकोनातून कोणताही नोकरदार वर्ग अथवा लोकसेवक आपले कार्य सुरळीत पार पाडण्याचा जेवढा जमेल तेवढा प्रयत्न करत असतो मात्र पोलीस खात्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे पुढचे येणारे जे पदोन्नतीचे पद आहे ते नाकारण्याचा सर्रास प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त हे पद पोलीस खात्यामध्ये मोठे आहे की वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद मोठे आहे असा प्रश्न नक्कीच पडल्याशिवाय राहत नाही.

 बऱ्याच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या त्यांच्या सेवाश्रेष्ठानुसार व अनुभवा प्रमाणे त्यांच्या पदोन्नतीचे आदेश वरिष्ठाकडून काढले जातात मात्र काही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सहाय्यक पोलीस आयुक्त पद नाकारले आहे म्हणजेच त्यांना पदोन्नती नको? या पदोन्नतीमुळे मुळे अधिकाऱ्यांना जास्त पगार मिळू शकतो अधिकार देखील वरिष्ठ पोलीस निरीक्ष पेक्षा जास्त प्राप्त आहेत तरीसुद्धा कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदोन्नती घेण्यास नकार का देतात हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे. पोलीस खात्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्यांनी पदोन्नतीला नकार दिलेला आहे अशा वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला पदोन्नती देणाऱ्या वरिष्ठांनी जाब विचारला पाहिजे असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

एखाद्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जर पदोन्नती नाकारली तर ती कायद्याला धरून आहे का? याचा विचार पदोन्नती देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व त्या कार्यालयाने करायला हवा अथवा ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आपली पदोन्नती होऊन देखील त्या पदोन्नतीस नकार दिला असेल तर त्याची तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यातून बदली करून त्या अधिकाऱ्याला पोलीस आयुक्त मुख्यालयात कार्यरत ठेवले पाहिजे

 त्या अधिकाऱ्यास दुसरे पोलीस स्टेशन अथवा वाहतूक शाखा अशा विविध महत्वाचे आणि कामकाजाच्या शाखा आहेत त्यावर त्यांना कार्यरत ठेवू नये…

ज्या पदोन्नती झालेले पोलीस अधिकारी यांना जवळचे म्हणजेच यापूर्वी ज्या शहरात कार्यरत होते त्याच शहरात किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात त्यांची वर्णी लागल्यास ते त्या पदोन्नतीस नकार देत नाहीत मुख्यतः त्यांचा कहल मुंबई, ठाणे, नवी मुंबई यासारख्या शहरांमध्ये असतो या शहरांमध्ये त्यांची वर्णी न लागल्यास ते ग्रामीण भागात त्यांच्या वाढत्या वयोमानानुसार नकार देत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.. व काही अधिक कारणे आहेत ते सांगण्यास या जाणकार नागरिकांनी स्पष्ट नकार दिलेला आहे…

सुज्ञ नागरिकांचे मत

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे