रबाले पोलिसांनी चैन स्नॅचिंगचे 02 गुन्हे आणले उघडकीस आरोपीच्या मुस्क्या आवळल्या! आरोपीकडून
2 लाख 40 हजार किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत!..
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबईतील घनसोली सेक्टर 9 परिसरात रस्त्यातून पायी चालत असणाऱ्या एका 38 वर्षीय महिलेच्या छातीमध्ये बुक्की मारून तिच्या गळ्यातील चैन हिसकावून पोबरा केल्याची घटना घणसोली येथील खाडी ब्रिज सेक्टर 9 घरोंदा येथे घडली होती याबाबतची तक्रार रबाले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती रबाले पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना गुन्हा प्रकटीकरण विभाग रबाळे शाखा यांना केल्या होत्या त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांच्या पथकाने गुन्हा घडलेल्या ठिकाणी विविध सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपीची माहिती मिळताच आरोपीला कोपरखैरणे विभागातून गुन्हे प्रकटीकरण विभागाने शिताफीने ताब्यात घेतले आहे या आरोपीचे नाव रोहित शिवाजी गायकवाड वय वर्षे (24) असे असून तो कोपरखैरणे येथील सेक्टर 19 साई होली स्कूलच्या पाठीमागे राहणार आहे. विशेष म्हणजे या पोलीस तपासामध्ये याच आरोपीने ऑक्टोबर 2024 मध्ये अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे गुन्हे प्रकटीकरण विभागाने पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी या आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करण्यास यश प्राप्त केले आहे
दरम्यान सदर आरोपीचे मुळगाव माजलगाव बीड येथे असून हा आरोपी कोपरखैरणे विभागात वास्तव्यास होता. आरोपीकडून 2 लाख 40 हजार किमतीचे सोन्या-नाण्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
दरम्यान या कारवाईचा यशस्वी तपास करण्यासाठी पोलीस हवालदार प्रसाद वायंगणकर, पोलीस नाईक प्रल्हाद जाधव,पोलीस शिपाई राहुल साळुंखे, राजेश तडवी, भोपी, अभिजीत राळे, पोलीस नाईक विजय कारंकाळ, यांनी मेहनत घेऊन आरोपीला यशस्वीरित्या गजाड करण्यात यश मिळविले आहे याबाबतचा अधिक तपास रबाले पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे करीत आहेत
सुनील गायकवाड