
राष्ट्रीय दलित पॅंथर सेना यांचा वाशी मधील विवा स्पा वरती हल्ला बोल!
नवी मुंबई येथील वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विवा स्पा या स्पा मध्ये अनाधिकृत अनैतिक धंदा चालल्याची खबर महाराष्ट्राचे दलित पॅंथर सेनेचे उपाध्यक्ष पैलवान सचिन भोसले यांना समजताच राष्ट्रीय दलित सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन विवा स्पा मध्ये अनैतिक धंदा करणाऱ्या तरुणींना बाहेर काढून वाशी पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या हवाली केले आहे त्यामुळे अनाधिकृत स्पा चालवणाऱ्या मालकांचे धाबे दणाणले आहेत याबाबत माहिती अशी की न्यू डायमंडच्या शेजारी विवा स्पा अशा नावाचे मालिश करण्यासाठी विवा स्पाची स्थापना झाली मात्र या स्पामध्ये अनैतिक महिला देहविक्रीचा गोरख धंदा सुरू होत असे अशा गैर धंद्याला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय दलित पॅंथर या सेनेच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रियाताई सरोदे यांच्या माध्यमातून वाशी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना पाचरण करण्यात आले वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव रुपवते यांनी तात्काळ दखल घेऊन देहविक्रीच्या अनैतिक धंदा करणाऱ्या पाच ते सात महिलांना ताब्यात घेऊन वाशी पोलीस स्टेशनला थेट आणण्यात आले आहे.
यावेळी किशोर औसरमल राष्ट्रीय दलित तंत्र सेना नवी मुंबई अध्यक्ष, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष टिपू भाई पटवेधार, राष्ट्रीय महिला अध्यक्ष, अस्माताई शेख, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार, महाराष्ट्र उपाध्यक्ष नितीन जाधव, अंकुश केंगार सांगली जिल्हा उपाध्यक्ष, दशरथ गायकवाड, इत्यादी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन स्पा मालकाच्या विरोधात हल्लाबोल करत मासे पोलीस ठाण्याच्या पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले.
दरम्यान: वाशी पोलीस स्टेशन च्या हद्दी मध्ये असे कोणत्या प्रकारचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही असे आश्वासन वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेच्या कार्यकर्त्यांना दिले आहे याबाबत पुढील कारवाई वाशी पोलिसांकडून सुरू आहे
नवी मुंबई प्रतिनिधी – सुनील गायकवाड.



