Breaking
ब्रेकिंग

शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग म्हणजेच भारतीय संविधान होय!!

सुनील गायकवाड.

0 0 2 6 4 5

शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग म्हणजेच भारतीय संविधान होय!!

— ॲड. प्रज्ञेश सोनावणे

मानखुर्द – मुंबई (प्रतिनिधी) :- भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित करून समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्व या चार मूलभूत तत्त्वांचा समावेश करून घटनाकार बोधीसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला आणि भारतीय नागरिकांना एकसंघ एकत्रित संघटित ठेवण्यासाठी भारतीय संविधानाचे निर्मिती करून जगाला शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा आदर्श निर्माण करून दिलेला आहे. भारतीय संविधानाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत असताना आपल्याला भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकारासोबत, मूलभूत कर्तव्यांची सुद्धा जाणीव असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अधिवक्ता प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांनी बीएआरसी कॉलनी मध्ये वर्षावासाच्या निमित्ताने व्यक्त केले. 

बौद्ध रहिवासी संघ इंद्रधनुष्य निलगिरी बीएआरसी कॉलनी मानखुर्द मुंबई येथे वर्षावासाच्या निमित्ताने “भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव, बौद्ध धम्म आणि आपली जबाबदारी” या विषयावर दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी सात वाजता बुद्ध वंदना घेऊन पंचशिलाचे पालन करून, महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून सर्वांच्या प्रति मंगल मैत्री करण्यात आली होती. या निमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय बी डी शिंदे सर होते तर कार्यक्रमाची प्रस्तावना दिलीप इंगळे यांनी केले होते.

विषयाला पुढे घेऊन जाताना अधिवक्ता प्रज्ञेश सोनावणे यांनी बुद्ध धम्म संघ यांचे महत्त्वपूर्ण उदाहरण सांगून उपस्थितांची मने जिंकली. तसेच बुद्धांनी आखून दिलेले विनयपिटक हे संघातील प्रत्येक श्रामणेर, भिक्खू, भिक्खुणी हे योग्य प्रकारे पालन करताना दिसत नाही? तसेच पिंडपात करताना सुद्धा आपल्याला आढळतात दिसत नाही.?

ही फार मोठी शोकांतिका आहे. महामानव

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मानवतेचा संदेश देणारा अहिंसा आणि शांतता प्रस्थापित करणारा तसेच माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे जगातील सर्वोत्तम धम्म देऊन आपल्यावर उपकारच केलेले आहेत. त्यामुळे भारतीय संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या विचारांचा प्रभाव प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला आहे. 

असे असताना आपली जबाबदारी आहे की, भारतीय संविधानाचे योग्य पालन होणे त्याचे नियमित वाचन होणे जेणेकरून प्रत्येक भारतीय नागरिकांना संविधान आपले अधिकार कर्तव्य यांचे जबाबदारी समजायला वेळ लागणार नाही. कार्यक्रम समारोप करताना धम्म गाथा घेऊन करण्यात आले होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी 

अध्यक्ष बि.डी. शिंदे, सचिव दिलीप इंगळे, उपसचिव प्रियकांत कदम, खजिनदार सुनील गवई, उप खजिनदार अविनाश माने, विनोद कुमार जयस्वाल, प्रदीप खंडागळे, जीवन सुरवाडे, शशी धुंदे, शैलेंद्र तांबे, सल्लागार अविनाश तिरपुडे सर, संतोष कांबळे, रमेश सरवदे, किरण काटे, अतिश नेटनवरे, सुलोचना शिंदे महिला अध्यक्ष, प्रियांका शिंदे, जयश्री इंगळे, विशाखा खंडागळे, कविता रंधे, अनिता सोष्टे, अश्विनी भंडारे, लता सरवदे, दिपाली नितनवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सुनील गायकवाड.

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे