
भारताचे पहिले गृहमंत्री व उपप्रंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 159 व्या जयंतीनिमित्त रबाले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एकता दौंड रॅलीचे आयोजन शुक्रवारी आठ ते नऊच्या दरम्यान करण्यात आले होते या रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवून रॅली यशस्वी केली
इच्छा पूर्ती मंदिर ऐरोली ते नेव्हा गार्डन, या पाटणी रोड ऐरोली मार्गावर 400 ते 450नागरिकांनी यात सहभाग नोंदविला. 12 अधिकारी, 67 अंमलदार यात सहभागी होते सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे नागरिक, विद्यार्थी, प्रिंट व डिजिटल मिडिया प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला.
दरम्यान: एकता दौड चे आयोजन बाबत माहिती देण्यात आली. नंतर सायबर अवेअरनेस बाबतीत सूचना दिल्या व सायबर गुन्ह्यांच्या बाबत काळजी घेण्याचे आवाहन रबाले पोलिसांच्या वतीने करण्यात आले.