ब्रेकिंग
स्वर्गीय दिलीप काका कोठारी यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त दक्ष नागरिक परिवारातर्फे विनम्र अभिवादन
जुन्नर - संतोष राजे.

0
0
2
6
4
7
सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देव पूजला ज्यांनी अनंत त्यांची जीवन यात्रा कधी न सरो त्यांच्या जाण्याने…..
समाजामध्ये काही माणसं लाखात एक असतात आणि काही माणसांकडे लाख लोक असतात परंतु ती माणसात नसतात.अशाच प्रकारे माणसात नसलेल्या माणसांना माणूस बनवून समाज घडवणारे व्यक्ति म्हणजे आपले दिलीप काका कोठारी
मरावे परी कीर्ती रुपी उरावे… गंगेच पावित्र्य, गुलाबाची प्रसन्नता, आणि चंद्राची शितलता लाभलेला असं हे मनमिळाऊ विवेकशील व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी श्री दिलीप काका कोठारी.
समाजातून निघून गेल्यानंतर देखील एक प्रेरणादायी व्यक्ती! समाजातील बऱ्याच लोकांच्या मनामध्ये घर करून सामाजिक बांधिलकी जपायला भाग पाडणारे सृजनशील व्यक्तिमत्व.
काकासाहेबांच्या जाण्याने आम्हा पत्रकारांच्या मनामध्ये एक मोठी पोकळी तयार झाली असून ती पोकळी भरण्याचे काम त्यांचे चिरंजीव अभय शेठ कोठारी नेहमी प्रयत्न करत असतात.
काकांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही न भरणारी! परंतु मागे ठेवून गेलेले विचार आणि आचार तरुणाईच्या आणि पंचक्रोशीतल्या नागरिकांच्या मनात जागृत ठेवल्यामुळे आजही त्यांचे विचार सृजनशील मन, समाज उपयोगी काम करायला प्रवृत्त करते.
म्हणजेच मरावे परी कीर्तिरूपे उरावे.आपण गेलात परंतु समाजसेवेचा वसा मागे ठेवून गेलात.आपलं सहावे पुण्यस्मरण याचं अविस्मरण कधीच होत नाही. वयोवृद्ध लोकांना बसण्यासाठी दिलेले बाक. आणि तरुणाईसाठी एक गरुड भरारी. सन्माननीय दिवंगत दिलीप काका यांना अश्रू पूर्ण नयनांनी भावपूर्ण आदरांजली ही खूप छोटी सेवा.
सेवेचे ठाई तत्पर….
मुख्य संपादक संतोष राजे.
दक्ष नागरिक डिजिटल मीडियाचे डिजिटल वृत्तपत्र जुन्नर.
0
0
2
6
4
7
