
पनवेल : प्रजासत्ताक दिन निमित्ताने हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार सीमा परांजपे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रमुखा अतिथी म्हणून बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, सर्वात आश्वासक अशी लोकशाही असलेल्या आपल्या देशाकडे एका बाजूला प्रशिक्षित युवा मनुष्यबळ देणारा म्हणून तर दुसऱ्या बाजूला प्रगतीच्या दाही दिशांमध्ये विकसित होणारा देश म्हणून सारे जग पाहत आहे. ही भरीव प्रगती होत असताना ज्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागावर, शौर्यावर, हौतात्म्यावर आपण हे सारे मिळविलेले आहे,त्या स्वातंत्रवीरांचे योगदान आपण कधीच ही विसरता कामा नये. त्यांचा आपण सदैव सन्मान करायला पाहिजे. असेही आमदार महोदयांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी पवन चांडक, अतिरीक्त आयुक्त भारत राठोड ,मनपा माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, सहाय्यक आयुक्त स्मिता काळे, सहाय्यक आयुक्त डॉ.रूपाली माने, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर,सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण , तहसीलदार विजय पाटील , महापालिका अधिकारी-कर्मचारी,स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.