व्हीआयपी सुविधेच्या नावाखाली कळंबोली पोलिसांची बदनामी – दोषींवर कारवाई करा

पनवेल जितिन शेट्टी : राखीव पोलीसांना नोकरीवर रुजू दाखवून घरी बसवतात. त्यांच्याकडून पैसे घेऊन व्हीआयपी सुविधा देतात. कळंबोली पोलीस मुख्यालयात अशा प्रकारचा गैरप्रकार चालतो अशा तक्रारी काही समाजकंटकांनी सोशल मीडिया, एक्स या समाज माध्यमांवर प्रसारित केले होते. मात्र पोलीस मुख्यालयात कर्मचारी अहोरात्र सेवेसाठी सज्ज असतात. नाहक त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने अशा खोट्या बातम्या प्रसारित केल्या जातात. सोशल मीडियावर पोलिसांची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.कळंबोली पोलीस मुख्यालयात राखीव पोलीस निरीक्षकांना व्हीआयपी पद्धती अवलंबून कामावर हजर होण्याऐवजी सूट दिली जाते. पोलीस आयुक्त गुरु शिष्याची परंपरा अवलंबत तर नाही ना? , आर्थिक व्यवहार करून काही पोलिसांना घरी बसवले जाते. कार्यालयात त्यांची हजेरीपटावर सही असते. अशा पोलिसांवर कोण मेहेरबान असतो. त्याच्यामागे कोणाचे आर्थिक हित संबंध तर नाही ना ?, अशा काही लोकांना शंका होत्या. मात्र नववी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त तसेच पोलीस प्रशासन नेहमीच सज्ज असते. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नव्हे तर राज्यात कुठेही गरज पडली तर पुरवला जाईल एवढा पोलीस फौज फाटा त्यांचा नेहमीच सतर्क राहतो. मात्र काही लोक खंडणीच्या उद्देशाने पोलिसांना ब्लॅकमेल करतात. पैसे दिले नाही तर काही ना काही त्रुटी दाखवत सोशल मीडियावर बदनामी करतात. या प्रकारामुळे समाजामध्ये पोलिसांच्या प्रतिमेला हानी पोहोचते. हाच प्रकार कळंबोली पोलीस मुख्यालयात उघडकीस आला आहे. काही समाजकंटकांनी दिलेल्या बातमीच्या अनुषंगाने नवी मुंबईचे पोलीस आयुक्तांनी या संदर्भात तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्याबाबत अशी काही सुविधा कळंबोली पोलीस मुख्यालयात दिली जाते का याविषयी चौकशी करण्यात आली. मात्र आलेल्या तक्रारीनुसार झालेल्या या चौकशीमध्ये काही एक तथ्य नसल्याचं आढळून आलं आहे. पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक हे शिस्त लावण्यावर जास्त भर देतात. कामकाजाच्या वेळे व्यतिरिक्तही ते अनेकदा आपले कर्तव्य निभावतात. याचा काही लोकांना त्रास होत असल्याने आणि पोलीस मुख्यालयाचे नाव खराब व्हावे या उद्देशाने समाज माध्यमांना चुकीची माहिती पसरवतात. अशा लोकांमुळे पोलीस खाते बदनाम होत असून त्यांना वेळीच लगाम घालावा. पोलिसांचे नाव बदनाम करणाऱ्या अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून त्यांचे एक्स अर्थात ट्विटर आणि समाज माध्यमांवरील खाते कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी होत आहे.