
0
0
1
6
2
8
पनवेल प्रतिनिधि : पनवेलच्या रहिवासी भागात रस्त्यावर तसेच उद्यानात बसून दारू व गांजा पिणाऱ्यांना शहराध्यक्ष योगेश चिले यांच्या नेतृत्वात मनसेने चांगलीच अद्दल घडविली. त्यांना चोप देऊन त्या ठिकाणाहून हकलून काढले.पनवेल शहरासह नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा आणि परिसरातील रहिवासी भागातील रस्त्यांवर, तसेच आडोशाला आणि उद्यानात बसून अनेकजण दारू, गांजा तसेच इतर नशा करत बसलेले असतात. पोलिस त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाहीत, असा सवाल मनसेने केला आह.
0
0
1
6
2
8