सामाजिक कार्यकर्ता तथा तथाकथित पत्रकार अरमान उर्फ विक्रम संजय पवार पनवेल; पोलिसांच्या ताब्यात
जातीवरून शिवीगाळ व खंडणीच्या गुन्ह्यात होता फरार, तडीपार करण्याची होतेय मागणी..!!
पनवेल / जितिन शेट्टी : पनवेल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता व तथाकथित पत्रकार अरमान उर्फ विक्रम संजय पवार यास अखेर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर यांनी अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे शिताफीने अटक करून बेड्या ठोकायला आहेत. सन २०२१-२२ या कालावाधीमध्ये दौलत माने यांच्या ओळखीचा रमाकांत मान गोविंदा परिडा यांनी सांगितले की, ते व्यवसायासाठी जागा घेणार असल्याने त्याकरिता त्यांनी माने यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावरून त्यांनी रोख व बँकेचे कर्ज घेऊन एकुण ८० लाख रुपये त्यांना दिले होते. तसेच मानेंसह इतरांनी देखील त्यांना पैशांची मदत केलेली आहे. परंतु त्यानंतर त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी घेतलेली रक्कम कोणालाही परत केलेली नाही. म्हणून सुंदरसिंग ठाकुर, पोलीस शिपाई उरण पोलीस ठाणे यांनी रमाकांत मानगोविदा परिडा व इतर यांच्याविरुद्ध नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली होती. फसवणूक झालेले पैसे मिळवण्याकरिता पोलीस शिपाई ठाकुर यांनी माने यांना सांगितले की, अरमान उर्फ विक्रम संजय पवार हे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे तुम्ही मदत मागा ते मदत करतील व पैसे मिळवून देतील त्यानुसार दौलत माने व ठाकूर यांनी अरमान उर्फ विक्रम संजय पवार यांच्याशी संपर्क केला व गार्डन हॉटेल येथील शिवसागर हॉटेलला मिटिंग केली त्यावेळी अरमान उर्फ विक्रम संजय पवार यांनी सांगितले की, मी तुम्हाला रमाकात परिडा याच्याकडुन कायदेशीर मार्गाने पैसे काढुन देतो. तुम्ही मला ५ लाख रुपये द्या. त्यावेळी माने यांनी त्यांना सुरवातीला १ लाख रुपये देतो असे सांगितले. त्यानंतर माने यांनी स्वतः ५० हजार रुपये व पोलीस शिपाई ठाकुर यांनी ५० हजार रुपये असे १ लाख रुपये अरमान उर्फ विक्रम संजय पवार यांना त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांक 8850838556 यावर गुगल पे द्वारे पाठवले. त्यानंतर अरमान उर्फ विक्रम संजय पवार यांच्याशी दौलत माने व पोलीस शिपाई ठाकुर असे वेळोवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संपर्क करीत होते परंतु अरमान पवारने कोणताही प्रतिसाद दिला नाही व कोणतीही मदत केली नाही. उलट माने यांच्याकडेच उर्वरीत ४ लाख रुपयांची मागणी करु लागला व सदरचे पैसे दिले नाहीत तर, “मी तुम्हाला नोकरी करु देणार नाही, तसेच तुम्हाला भ्रष्टाचार व बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवणार, त्यासाठी तुम्ही मला उर्वरीत रक्कम द्या” अशी धमकी माने व ठाकूर यांना देऊ लागला त्यानंतर अरमान पवार याने संपर्क करणे बंद केले व माने ठाकूर यांचे १ लाख रुपये देण्यास टाळाटाळ करू लागला तेव्हा या दोघांनी अरमान पवार याला भेटून समजावले व मी बौद्ध अनुसुचीत जातीचा आहे, तु मला विनाकारण त्रास देऊन फसवु नको, तसेच मी पोलीस असुन देखील आमच्याकडे जबरदस्तीने पैशांची मागणी करु नको असे माने यांनी त्याला विनंती केली. मात्र अरमान पवार याने तु मला बौद्ध असल्याचे सांगु नकोस मला माहित आहे तू महार आहेस असे जातीवाचक बोलुन अरमान उर्फ विक्रम पवार याने, “तु पोलीस असला तरी मी तुला खोट्या गुन्हयात अडकवु शकतो” अशी धमकी देऊन पैशांची मागणी पोलीस कर्मचारी दौलतराव कृष्णा माने यांच्याकडे करीत राहिला. त्यावेळी तो कोणताही खोटा आरोप करुन माझी बदनामी करेल व मला नोकरीस त्रास होईल या भितीपोटी माने त्याला काहीही बोलले नाही व त्याची त्यावेळी तक्रार देखील केली नाही. त्यानंतर अरमान पवार हा वकील आशिर्वाद संधानशिव यांच्या मार्फत माने यांच्याकडे आला, त्यांनीही अरमान उर्फ विक्रम पवार यास समजावुन सांगितले. परंतु तरी देखील तो, “मी पत्रकार आहे, माझी खुप ओळख आहे, मी आरटीआय कार्यकर्ता आहे, उलट मलाच सर्व पोलीस व शासकीय अधिकारी घाबरतात” अशा धमक्या देऊन पैशांची मागणी करत राहिला अखेर अरमान उर्फ विक्रम पवार याच्या त्रासाला कंटाळून दौलतराव माने यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार अरमान उर्फ विक्रम संजय पवार याच्यावर भारतीय दंड संहिता ३१८(४), ३०८(७), ३५२, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ नुसार ३(१)(r), ३(१)(s) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार असताना तांत्रिक तपासाच्या आधारे सपोनि राजेंद्र घेवडेकर यांनी अटक केली आहे त्यास न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अरमान उर्फ विक्रम संजय पवार याने ट्विटर, फेसबुक, यु ट्यूबच्या व मनसेचा पदाधिकारी सांगून शासकीय यंत्रणेला नाहक त्रास देण्याचे काम वारंवार केले असून अनेकांना ब्लॅकमेल करून लाखोंच्या खंडणी उकळल्या असल्याचे देखील काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे पोलिसांनी देखील अधिक तपास करून अरमान उर्फ विक्रम संजय पवार याला तडीपार करावे अशी मागणी देखील होत आहे.