Breaking
ब्रेकिंग
Trending

रेल्वे प्रशासनाच्या विरोधात रिपाई आठवले गट च्या वतीने स्वाक्षरी मोहीम.

0 0 1 6 2 8

नवी मुंबई प्रतिनिधी : नवी मुंबई रेल्वे स्थानक आणि परिसरात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अपंग व ज्येष्ठ नागरिकांकरिता स्वयंचलित पायऱ्या आणि लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे पनवेल ठाणे नेरूळ आणि ठाणे वाशी मार्गावर लोकांचा फेऱ्या वाढवण्यात याव्या महिलांवरील वाढणारे अत्याचार लक्षात घेता रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षतेसाठी रेल्वे स्थानकात महिला रेल्वे पोलीस नेमण्यात यावे तसेच पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी, रेल्वे स्थानकामध्ये सुलभ शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची दुरावस्था असल्याने हा प्रश्न सोडवावा तसेच प्रत्येक रेल्वे स्थानकाबाहेर दोन्ही बाजूला रेल्वे तिकीट घराचे सुविधा उपलब्ध करून द्यावी यांसह अनेक मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश खरे यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. नेरूळ रेल्वे स्थानक येथे जिल्हाध्यक्ष महेश खरे, कार्याध्यक्ष धरमसी पटेल, सरचिटणीस एल. आर. गायकवाड, कोपरखैरणे रेल्वे स्टेशन येथे कार्याध्यक्ष विजय कांबळे, प्रमुख संघटक नारायण मोरे, घणसोली रेल्वे स्थानक येथे नवी मुंबई प्रवक्ते सचिन कटारे, सचिव प्रकाश तुळसे, ऐरोली येथे नवी मुंबई उपाध्यक्ष टिळक जाधव बेलापूर विधानसभा अध्यक्ष महेश कांबळे, बेलापुर रेल्वे स्थानक येथे सुनील रसनभैरे, वाशी रेल्वे स्थानक येथे आयुब खान, जुईनगर येथे घोडके, तुर्भे येथे रमेश जोगदंड, सिवूड्स येथे महेश जंगले, यांसह घणसोली विभाग अध्यक्ष सोमा कांबळे, सरचिटणीस संकेत पवार, मंगेश गायकवाड,bअशोक जाधव, वसंत जाधव, भीमराव तायडे, बालाजी कांबळे, बाबू गायकवाड, मंगेश रणदिवे, अनंत तांबे, अनंत पवार, रवी गायकवाड, सागर कसबे, विनय मसुरकर, धम्मपाल नीखडे, आश्विन कुमार धस्के, प्रकाश सुरवाडे, बाबासाहेब डाके ,चाबुकस्वार, साठे, विजय पगारे, विजय दांडके ,राजू कांबळे आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

4/5 - (1 vote)

JITHIN SHETTY

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 6 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे