Breaking
ब्रेकिंग
Trending

कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचलित अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यालयाला मिळणार अत्याधुनिक इंटरॅक्टिव्ह बोर्ड

0 0 1 8 7 3

पनवेल जितिन शेट्टी : रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचलित अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या समारंभात कला, शालेय क्रीडा, वक्तृत्व व नमो चषक क्रीडा व इतर विविध शालेय, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.

         यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक रविंद्र भोईर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच या कार्यक्रमावेळी आय.डी.बी. आय. बँकेकडून विद्यार्थ्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणासाठी बेनक्यू या कंपनीचा अत्याधुनिक इंटरॅक्टिव्ह बोर्ड विद्यालयास भेट देण्यात आला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात शालेय जीवनातल्या आठवणी आणि काही प्रसंग तसेच विद्यालयाच्या जडणघडणीचा आढावा घेतला. तसेच विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख व स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांचेही भाषण झाले. दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यास सुलभ होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यालय व महाविद्यालयास १८ लाख रुपयांचे २० इंटरॅक्टीव्ह बोर्ड देण्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केले. यावेळी विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे व मंत्रमुग्ध करणारे नृत्य, नाट्य, गायन, पथनाट्य अशा विविध रंगी आणि वैविध्यपूर्ण आविष्कारांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.

       या सोहळ्यास स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, गव्हाण ग्रामपंचायतच्या माजी सरपंच माई भोईर, माजी उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, प्राचार्या प्रणिता गोळे, ज्येष्ठ नेते जयवंत देशमुख, व्ही. के. ठाकूर, वामनशेठ म्हात्रे, भाऊ भोईर, मदन पाटील, वैभव घरत, पी. के ठाकूर, राम मोकल, राजेंद्र देशमुख, रघुनाथ देशमुख, किशोर पाटील, अंकुश ठाकूर, कुंदन मोकल, नामदेवराव ठाकूर, विधिज्ञ रुपेश म्हात्रे, कमलाकर देशमुख, शालिक भोईर, अनुसया घरत, चिंतामण गोंधळी, किरण म्हात्रे, प्रिया शिंदे, प्राचार्य गोवर्धन गोडगे, रविंद्र भोईर, प्रमोद कोळी, संदिप भोईर, बाबुलाल पाटोळे आदीं-सह पंचक्रोशीतील इतर मान्यवर नागरिक, पालक, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

JITHIN SHETTY

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे