आफ्रिकन महिलेच्या लघवी लीक त्रासातून अपोलोने केली मुक्तता
४० वर्षीय मोझाम्बिक महिलेवर लघवी असंयम आजारावर मिनीमली इन्वेसिव्ह प्रक्रिया करण्यात आली

नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये आग्नेय आफ्रिकेतील एक देश मोझाम्बिकहुन आलेल्या ४० वर्षे वयाच्या महिलेवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. श्रीमती ऍलिस यांना बऱ्याच वर्षांपासून मूत्र असंयमाचा त्रास (लघवी लीक) होता. या विकाराचा खूप मोठा परिणाम त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर झाला होता, खोकणे किंवा शिंकणे यासारख्या सामान्य क्रिया देखील खूप आव्हानात्मक बनल्या होत्या. अपोलो हॉस्पिटल्समध्ये श्रीमती ऍलिस यांच्यावर मिनिमली इन्वेसिव्ह प्रक्रिया करण्यात आली, ज्यामुळे त्यांना लक्षणांपासून आराम मिळाला आणि त्यांना स्वतःचा आत्मविश्वास परत मिळवण्यात मदत मिळाली. या यशस्वी सर्जरीने त्यांना त्यांची जीवन गुणवत्ता परत मिळवून दिली, इतकेच नव्हे तर, स्वातंत्र्याची नवीन अनुभूती करून दिली, मूत्र असंयमची चिंता न करता जीवन जगण्याची सुविधा मिळवून दिली.मूत्र असंयम ही एक सर्रास आढळून येणारी समस्या आहे पण तरीही गैरसमजुती, सामाजिक कलंक आणि त्यावरील उपचारांविषयी जागरूकतेचा अभाव त्यामुळे बहुतांश वेळा ही समस्या दुर्लक्षिली जाते. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने महिलांना आवाहन केले आहे की, असे त्रास होत असतील तर गप्प राहू नका, पुढे या, बोला आणि टीओटी सर्जरीसारख्या मिनिमली इन्व्हेसिव पर्यायांची माहिती करून घ्या. हे उपचार तुमच्या जीवनाची गुणवत्ता आणि तुमचा आत्मविश्वास परत मिळवून देऊ शकतात. श्रीमती ऍलिस यांच्यावर ट्रांस-ओबट्यूरेटर टेप (टीओटी) सर्जरी ही मिनिमली इन्व्हेसिव प्रक्रिया करण्यात आली. या प्रगत तंत्रामध्ये एक छोटी चीर दिली जाते आणि स्पायनल ऍनेस्थेशिया देऊन ही प्रक्रिया केली जाते. अति जोखमीची स्थिती असलेल्या, श्रीमती ऍलिस यांच्यासारख्या रुग्णांसाठी ही प्रक्रिया जोखीम कमी करते. या प्रक्रियेनंतर त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झाली आणि लघवी लीकच्या त्रासातून मुक्तता मिळाली. श्रीमती ऍलिस, मूत्र असंयमीत रुग्ण, मोझाम्बिक यांनी सांगितले,”गेली अनेक वर्षे मी भीती आणि अस्वस्थतेमध्ये काढली, लघवी लीक होईल या भीतीने मी अगदी साध्यासोप्या गोष्टी देखील करू शकत नव्हते. शारीरिक ताण तर होताच पण त्याहीपेक्षा मोठे मानसिक दडपण स्वतःसोबत घेऊन जगत होते. मला खूप ओशाळल्यासारखे व्हायचे, चारचौघांमध्ये जाणे मी टाळायचे आणि रोजची साधीसोपी कामे करताना देखील मला खूप त्रास व्हायचा. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने माझ्या आयुष्यात नवे परिवर्तन घडवून आणले. डॉक्टरांनी माझ्यावर अतिशय सहाभूतिपूर्ण भावनेने उपचार केले, मला नीट समजून घेतले. आज मी आत्मविश्वासाने चालू शकते आणि भीती न बाळगता जगू शकते आहे.”डॉ हिमानी शर्मा, सिनियर कन्सल्टन्ट-ऑब्स्टट्रिक्स, गायनॅकॉलॉजी आणि रोबोटिक सर्जरी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी उपचार करण्याचे महत्त्व समजावून सांगताना त्या म्हणाल्या,”मूत्र असंयम ही फक्त एक वैद्यकीय स्थिती नाही तर हे एक आव्हान आहे, महिलेच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर याचा प्रभाव पडतो. महिलेचा आत्मविश्वास, तिची चारचौघांमध्ये मिसळण्याची क्षमता आणि तिचे इतरांसोबतचे संबंध या सर्वांवर त्याचा परिणाम होतो. अनेक महिला हा त्रास कोणालाच सांगत नाहीत किंवा त्यांना याबद्दल काहीच माहिती नसते, त्यामुळे त्या उपचार करून घेत नाहीत. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये आम्ही प्रगत उपचार पुरवू शकतो, हे उपचार सुरक्षित आणि प्रभावी असतात. उपचार यशस्वी झाल्यानंतर त्या महिलेच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आमची खात्री पटली की, आम्ही त्यांना त्यांचे आयुष्य परत मिळवून देण्यात मदत केली आहे आणि हेच आमच्या कामाचे सर्वात मोठे समाधान आहे.”मूत्र असंयम हा त्रास अनेकांना असतो पण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. खासकरून मध्यमवयीन महिलांना हा त्रास सर्रास जाणवतो. श्रीमती ऍलिस यांचा मूत्र असंयमाचा त्रास गंभीर होताच शिवाय त्यांना इतरही अनेक त्रास होते, त्यामुळे पारंपरिक सर्जिकल पर्याय असुरक्षित ठरण्याची शक्यता होती. तरीही अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील अत्याधुनिक सुविधा आणि विशेषज्ञांच्या मेडिकल टीमने केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना असे सोल्युशन मिळाले ज्यामुळे त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले.