एकाच वेळी तब्बल 09 बांगलादेशींना अटक, पेल्हार पोलिसांची कारवाई
पेल्हार पोलिसांनी आज तब्बल 09 बांगलादेशींना अटक केली आहे. हे सर्व बांगलादेशी नालासोपारा येथे राहत होते.

नालासोपारा :- पेल्हार पोलिसांनी आज तब्बल 09 बांगलादेशींना अटक केली आहे. हे सर्व बांगलादेशी नालासोपारा येथे राहत होते. तपास करताना तब्बल 09 बांगलादेशींचा शोध लागला आहे. भारतात अनधिकृत घुसखोरी आणी रहिवासी म्हणून ही अटक केली आहे. काही केल्या बांगलादेशी नागरिकांची भारतातील घुसखोरी कमी होताना दिसत नाही. सातत्यानं कुठे ना कुठे बांगलादेशी नागरिक सापडत आहेत. आज पेल्हार पोलिसांनी तब्बल 09 बांगलादेशींना अटक केली आहे. हे सर्व नागरिक अनधिकृतरित्या या ठिकाणी राहत होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारीच्या दरम्यान पोलीस हवालदार अनिल शेगर यांना त्याचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, भागवत बिल्डींग, गांगडीपाडा, धानीवबाग नालासोपारा पूर्व येथे परदेशी नागरीक अनधिकृतपणे वास्तव्य करीत असल्याची समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना कळविले असता त्यांनी माहितीची खातरजमा करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, दोन पंच आणि त्यांच्या पथकाने धानीवबाग येथे सापळा रचुन 07 महिला व 02 पुरूष संशयितरित्या वावरताना दिसुन आले आहे. पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच,बांगलादेश मधील गरिबी, उपासमारी व बेरोजगारीला कंटाळून भारताच्या सरहद्दीवरील गस्ती पथकाची नजर चुकवून इसामोती नदी पार करुन हकिमपुर गांव, 24 परगणा, पश्चिम बंगाल मार्गे पं बंगाल हावडा येथुन रेल्वेने मुंबई येथे आल्याचे सांगितले.तसेच,या ठिकाणी राहत असुन मिळेल ते काम करुन उदरवनिर्वाह करत असल्याचे सांगितले आहे.
अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे..!!
नुरजलाल अल्ताफ हुसेन मोल्ला (वय 42),राखी नुरजलाल मोल्ला ऊर्फ तंजीला खातुन (वय 27),मालुती बाबुल मिस्त्री (वय 42),अकलिमा जोटु विश्वास, (वय 35),रत्ना अमानत मोल्ला ऊर्फ आशा सचिन शिंदे (वय 40),जावेदुल अजीजूर रेहमान शेख (वय 38),रुबी जोनाद्दीन खातुन (वय 35),फातीमामंडल जावेदुल रेहमान शेख (वय 40),दिलरुबा पंकज चौहाण, (वय 45).
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3. विरार,बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाण्याचे जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दुर्गा चौधरी, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघचौरे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार रवि वानखेडे, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, वसिम शेख, पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.