पनवेल मधील Sky Empire येथे बालकामगार, शिवसेना बांधकाम कामगार सेना आक्रमक
पनवेल पोलीस शहर ठाण्यात तक्रार दाखल, कामगारांची नोंद नसल्याचा तसेच बाल कामगार असल्याचा गंभीर आरोप

पनवेल जितिन शेट्टी :- शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आक्रमक पवित्रा स्वीकारून Sky Empire या बांधकाम साईटच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना पत्रद्वारे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. पनवेल तालुका अध्यक्ष यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात पत्राद्वारे तक्रार दाखल करत म्हणाले की, सेक्टर-3 दापोली पुष्पक नगर येथे प्लॉट नंबर-5 चालू असलेल्या विकास कामांमध्ये Sky Empire या साईटवर कोणत्याही प्रकारचे कामगारांची नोंद नसून येथे मोठ्या प्रमाणावर बालमजूर असल्याचे तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तसेच, हे कामगार भारतीय आहेत का बांगलादेशी असाही प्रश्न यावेळी उपस्थित होताना दिसत असून त्वरित Sky Empire कारवाई करण्याचे मागणी केली असून अन्यथा या विरोधक मोठ्या आंदोलन करेल असा इशाराही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.