
पनवेल संतोष राजे : पनवेलमध्ये अतिक्रमणांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच. या समस्या निवारणाची जबाबदारी ज्यांच्यावर असते तेच लोकप्रतिनिधी आपल्या वाढदिवसा निमित्त सामाजिक कार्याच्या नावाखाली अनधिकृत बांधकामे करत असतील तर पनवेलकरांनी न्याय कुणाकडे मागावा हाच प्रश्न उपस्थित होतो. हाच प्रताप माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मोठा गाजावाजा करत केला आहे. आता याप्रकरणी महापालिका अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आगामी निवडणूका लक्षात घेता माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस नेहमीप्रमाणेच मोठया जल्लोषात साजरा झाला. मतदारांना काबिज करण्यासाठी, मत मिळवण्यासाठी आपल्या सामाजिक कार्याचा आलेख उंचावण्यासाठी साहाजिकच आपल्या वाढदिवस निमित्ताने सामाजिक कार्याचा गाजावाजा करत श्रेय घेण्याचा प्रयत्न करताना दिसून आले,ओरियन मॉलच्या मागील बाजूस सम्राट लॉजच्या बाजूला डिलिवरी बॉयसाठी बसण्याची सोय व्हावी म्हणून स्थानिक माजी नगरसेवकाने सिमेंटचे बाक बांधले. मात्र हे अनधिकृत असल्याचा त्यांना विसर पडला असावा म्हणून या सामाजिक कार्याला मिरवत श्रेय लाटण्याचा प्रयत्न परेश ठाकूर यांच्याकडून त्यांच्या माझी नगरसेवकांकडून झालेला दिसतो. पनवेलमध्ये सध्या सत्ताधारी देव आहेत हे समजणाऱ्या अधिकाऱ्यांना सत्य आणि न्याय ह्याकडे बघणे गरजेचे वाटत नसल्यामुळे जागरूक नगिरीक हतबल होऊन अन्याय होत आहे हे बघण्यापलीकडे मार्गच नाही यात भ्रष्टाचारयुक्त महापालिका तसेच पनवेल महापालिकेचे आयुक्त मुग गिळून गप्प बसतात या अशा अनधिकृत कारवाईचे आदेशआयुक्त देतात का आता याची प्रतिक्षा पनवेलकरांना आहे.