Breaking
ब्रेकिंग
Trending

पनवेल, तक्का येथील प्रवेशद्वाराजवळील गटारावर विनापरवानगी बांधलेल्या मटणाच्या दुकानांवर अधिकारी मेहेरबान

मटणाच्या अनधिकृत दुकानावर पालिकेचा हातोडा?

0 0 1 8 7 3

 

पनवेल जितिन शेट्टी : महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती “ड” अंतर्गत, तक्का गावाच्या प्रवेशद्वाराजवळ, दोन मटण दुकानदारांनी अत्यंत बेजबाबदारपणे आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने आपल्या दुकानांचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम केवळ अनधिकृतच नाही, तर थेट गटारावरच करण्यात आले आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. या ठिकाणी उघड्यावर, अस्वच्छ जागी मटण विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.गटारातील दुर्गंधी, माश्या, कीटक आणि इतर जंतुंमुळे हे मटण दूषित होण्याची दाट शक्यता आहे. असे दूषित मटण खाल्ल्याने नागरिकांना अनेक प्रकारचे आजार होऊ‌ शकतात, विषबाधा होऊ शकते आणि साथीचे रोग देखील पसरू शकतात. या दुकानांचा केवळ आरोग्यावरच दुष्परिणाम होत नाही, तर या अनधिकृत बांधकामामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रवेशद्वाराजवळच असलेल्या या दुकानांमुळे वाहतूक कोंडी होते आणि नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होतो. या हे सर्व पाहता, या मटण दुकानदारांनी केवळ महानगरपालिकेच्या बांधकाम नियमांचेच उल्लंघन केलेले नाही. तर त्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी देखील खेळ मांडला आहे.या दुकानांचे शेडचे बांधकाम देखील पूर्णपणे अनधिकृत आहे या दोन्ही मटण दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.गटारावरील हे अनधिकृत बांधकाम त्वरित तोडून टाकण्यात यावे. या दुकानदारांना उघड्यावर, अस्वच्छ ठिकाणी मटण विक्री करण्यास मज्जाव करण्यात यावा. भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून या परिसरात नियमितपणे तपासणी करण्यात यावी.अशी माहिती युवा ग्रामीण पत्रकार संघ पनवेल तालुका अध्यक्ष जितिन शेट्टी यांनी दिली. आयुक्त मंगेश चितळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने योग्य ती पावले उचलतील अशी अपेक्षा युवा ग्रामीण पत्रकार संघ पनवेल तालुका अध्यक्ष जितिन शेट्टी यांनी व्यक्त केली.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

JITHIN SHETTY

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे