कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची तिकिटे ब्लॅक केल्याप्रकरणी सायबर सेल कडक, या सूचना जारी
'बुक माय शो' आणि 'झोमॅटो' या दोन मोठ्या तिकीट साइटच्या अधिकाऱ्यांना सायबर पोलिसांकडून निर्देश

मुंबई :- महाराष्ट्र सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव म्हणाले की, मोठ्या इव्हेंटच्या वेळी अनेक लोक मोठ्या प्रमाणावर तिकीट खरेदी करत होते, ती ठेवतात आणि इतर प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पटींनी त्यांची विक्री करत असल्याचे दिसून आले आहे.यशस्वी यादव यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाची चौकशी केली, त्यानंतर आम्ही ‘बुक माय शो’ आणि ‘झोमॅटो’ या दोन मोठ्या तिकीट साइटच्या अधिकाऱ्यांना बोलावले आणि आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. ते म्हणाले की, दोन्ही साईट्सच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे की, तिकिटांची मागणी पुरवठ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते अशा ठिकाणी तिकीट खरेदीदाराच्या नावाने विकावे, जेणेकरून काळाबाजार होणार नाही.तसेच, जो कोणी त्या तिकिटासह कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचेल त्याला भारत सरकारने जारी केलेले त्याचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स) दाखवावे लागेल. तिकिटावर लिहिलेले नाव ओळखपत्रावरील नावाशी जुळले तरच कार्यक्रमात प्रवेश दिला जातो. यशस्वी यादव पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सायबर या संदर्भात एक श्वेतपत्रिकाही प्रसिद्ध करणार आहे, जी सर्व तिकीट प्लॅटफॉर्मच्या ऑपरेटरकडून माहिती घेऊन तयार करण्यात आली आहे. ही श्वेतपत्रिका कायदेशीर स्वरूपात असेल, ज्यामध्ये तिकीट विक्री आणि तिकीट प्लॅटफॉर्मवर कोणते तांत्रिक बदल आवश्यक आहेत हे लिहिलेले असेल. अमित व्यास नावाच्या वकिलाने तक्रार दाखल केली होती की कंपनी 19 जानेवारी ते 21 जानेवारी 2025 या कालावधीत होणाऱ्या कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार करत आहे. व्यास यांनी सांगितले होते की, तिकीटाची खरी किंमत 2500 रुपये आहे, तर ती मध्यस्थीमार्फत 3 लाख रुपयांपर्यंत विकली जात आहे.