पनवेलमधील क्रेजी बॉयस बार अश्लीलतेचा अड्डा? पोलिस कारवाईपासून का पळ काढत आहेत?

पनवेल इम्रान चौधरी : पनवेल तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या क्रेजी बॉयस बार अँड रेस्टॉरंटवर गंभीर आरोपांचा भडिमार झाला आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बारमध्ये अरुण शेट्टी आणि विश्वनाथ देवेडिंग हे दोघे मिळून अश्लील डान्स आणि बेकायदा गतिविधी चालवत असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, परिसरातील इतर सर्व बारांवर पोलिसांचा पहारा असताना, क्रेजी बॉयस बारवर मात्र असा कोणताही पहारा दिसत नाही. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, या बारमध्ये नाममात्र कपड्यांमध्ये मुलींकडून डान्स केला जातो, नोटांची उधळण केली जाते आणि गांधीजींच्या छाप असलेल्या नोटांना पायाखाली तुडवले जाते. हे सर्व खुलेआम चालते, तर बारच्या बाहेर तैनात असलेल्या वॉचमॅनकडे रिमोट असते. पोलिसांची गाडी दिसताच लाल लाइट पेटवली जाते आणि मुलींना केबिनमध्ये लपवले जाते. स्थानिकांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या असूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.या गैरकानूनी धंद्याविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “पोलिसांना आमची काही मदत हवी असेल किंवा पुराव्याच्या स्वरूपात डान्सचे व्हिडीओ क्लिप हवे असतील, तर आम्ही ते देण्यास तयार आहोत,” असे एका स्थानिकाने सांगितले. स्थानिकांचा आरोप आहे की, पोलिसांची मिलीभगत असल्याशिवाय असा अवैध कारोबार खुलेआम चालू शकत नाही. पनवेल तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत असा प्रकार घडत असताना पोलिस का गप्प आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. “हा प्रकार जनहिताविरोधी आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कारवाई करावी,” अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली आहे.
पत्ता: 384k1f, कोलखे, कोन, पनवेल, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, 410221
ही खबर सतर्क नागरिकांच्या आवाजातून समोर आली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. पोलिस आणि प्रशासन या प्रकरणात काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.